Karnataka Viral Video : PM मोदींच्या फोटोचे शेतकऱ्याने घेतले चुंबन ; Video व्हायरल..

Farmer Kisses PM Modi's Pic Karnataka : मी तुमच्या चरणी नतमस्तक आहे, तुम्ही विजयी व्हाल,"
Farmer Kisses PM Modi's Pic Karnataka
Farmer Kisses PM Modi's Pic Karnataka Sarkarnama
Published on
Updated on

Farmer Kisses PM Modi's Pic : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विविध योजनांवर विरोधक नेहमीच चिखलफेक करीत असतात, अशातच कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या Karnataka Election 2023) पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

एका ज्येष्ठ शेतकऱ्याचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एसटी बसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचे शेतकरी चुंबन घेताना भावुक झाल्याचा या व्हिडिओमध्ये दिसते.

पंतप्रधानांच्या फोटोशी बोलताना या व्हायरल व्हिडिओमध्ये शेतकरी भावूक झालेला दिसतो. मोदींच्या चेहऱ्यावर प्रेमळपणे हात फिरवत आहेत.

मोदींच्या फोटोचे चुंबन घेतल्यावर कन्नड भाषेत ते म्हणतात, "आधी मला 1,000 मिळत होते, तुम्ही आणखी 500 देण्याचे ठरवले होते. तुम्ही सांगितले होते की तुम्हाला आमची घरे हिरवीगार हवी आहेत. तुम्ही आमच्या आरोग्यासाठी ₹ 5 लाख देऊ असे सांगितले होते. मी तुमच्या चरणी नतमस्तक आहे, तुम्ही विजयी व्हाल,"

Farmer Kisses PM Modi's Pic Karnataka
Lalit Modi On Rahul Gandhi: राहुल गांधींचा पाय आणखी खोलात ; मोदी न्यायालयात जाणार ; म्हणाले, "पप्पू..साबित करो मैं..'

कन्नड भाषेतील हा व्हिडिओ आहे. शेतकऱ्यांच्या बोली भाषेवरुन ते जुन्या म्हैसूर परिसरातील असावे, असा अंदाज आहे. या व्हिडिओवर कन्नड भाषेत विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. सोशल मीडियावर इंजीनियर मोहनदास कामथ यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

नेटकरी म्हणतात..

  1. मोदीजी जनतेच्या मनात आहे, हेच ते सत्य आहे.

  2. यालाच म्हणतात सन्मान, जो मनापासून व्यक्त होत आहे.

  3. कोट्यावधीं जनतेचा आशीर्वाद मोदींच्या पाठिंशी आहे.

  4. मोदींच्या विरोधात कितीही फलकबाजी करा, पण जनतेचे असे प्रेम तुम्हाला कधीच मिळत नाही.

Farmer Kisses PM Modi's Pic Karnataka
BV Srinivas Defamation Notice: स्मृती ईराणींना 'डार्लिंग' म्हणणं काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या अंगलट; Video पाहा; डार्लिंग बना कर…

बुधवारी निवडणूक आयोगाने 224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.येथे एकाच टप्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे. 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिणेकडील राज्यात विकासाच्या खेळपट्टीवर भारतीय जनता पक्ष उभा आहे.

दक्षिणेतील एकमेव भगव्या बालेकिल्ल्यात 'डबल इंजिन' सरकार सुरू ठेवण्याचे आवाहन ते करत आहेत. भाजपकडे सध्या 119 जागा आहेत, तर काँग्रेसकडे 75 जागा आहेत. जेडीएसकडे 28 आमदार आहेत, तर दोन जागा रिक्त आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com