Mumbai News: आधी अभिनेता सलमान खानला सातत्यानं धमकी दिल्याप्रकरणी आणि परत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई पुन्हा चर्चेत आला आहे. लॉरेन्स बिश्नोई हा गुजरातमधील तुरुंगात आहे.
त्याच्या टोळीतील शूटर्स देशभरात पसरले आहेत. मात्र, बिश्नोईचा ‘गेम’ करणाऱ्याला अर्थात त्याचा ‘एन्काउंटर’ करणाऱ्याला 1 कोटी, 11 लाख, 11 हजार, 111 रूपये देण्यात येणार आहेत. होय तुम्ही ऐकलं ते खरे आहे. थेट बिश्नोईचा ‘एन्काउंटर’ करणाऱ्याला एवढी रक्कम देण्यात येणार आहे.
करणी सेनेचे अध्यक्ष राज शेखावत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात लॉरेन्स बिश्नोईचा ‘एन्काउंटर’ करणाऱ्या पोलिसाला एक कोटी 11 लाख, 11 हजार, 111 रूपये देण्याची घोषणा शेखावत यांनी केली आहे.
राज शेखावत म्हणाले, “आमचे अनमोल रत्न, शहीद सुखदेव सिंह गोगामेडी यांचा हत्यारा लॉरेन्स बिश्नोईचा ‘एन्काउंटर’ करणाऱ्या पोलिसाला क्षत्रिय करणी सेना 1 कोटी, 11 लाख, 11 हजार, 111 रूपये देईल. त्यासह त्या पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबाची सुरक्षा करण्याची जबाबदारी आमची राहिल. जय माँ करणी.”
गोगामेडी यांची केलेली हत्या...
करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची 5 डिसेंबर 2023 मध्ये अज्ञातांनी जयपूर येथील घरात घुसून गोळीबार करत हत्या केली होती. या घटेनंतर शूटर्स फरार झाले होते. मात्र, काही वेळानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगनं गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली होती.
या हत्येप्रकरणी 5 जूनला आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यात रोहित गोदारा याला गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी मास्टमाइंड बनवण्यात आलं आहे. त्यासह गोल्डी ब्रार आणि वीरेंद्र चारणसह अन्य काहीजणांवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. हे सगळेजण बिश्नोई गँगशी संबंधित आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.