kartikeya Chouhan : 'आज दिल्लीही आपल्या नेत्यासमोर..' ; केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहानांच्या मुलाचे विधान चर्चेत!

Shivraj singh Chouhan son kartikeya Chouhan : सीहोर जिल्ह्यातील बुधनी विधानसभा मतदारसंघातील भेरुंडा येथे एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केलं होतं.
kartikeya Chouhan
kartikeya ChouhanSarkarnama
Published on
Updated on

केंद्रीय कृषीमंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे पुत्र कार्तिकेय चौहानचे सीहोर येथील एका कार्यक्रमातील विधान चांगलेच चर्चेत आले आहे आणि व्हायरलही होत आहे. ज्यामध्ये कार्तिकेय आपल्या वडिलांची स्तुती करताना दिसत आहे.

कार्तिकेय म्हणत आहे की, लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात भाजपच्या प्रचंड विजयानंतर संपूर्ण दिल्ली त्यांच्या वडिलांसमोर नतमस्तक आहे. कार्तिकेय चौहाननी सीहोर जिल्ह्यातील बुधनी विधानसभा मतदारसंघातील भेरुंडा येथे एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केलं होतं.

त्यांच्या या विधानाचे व्हिडिओ विविध पक्षांचे नेते शेअर करत आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभा निवडणुकीत विदिशा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्क्याने विजय मिळवला होता. भाजपने मध्य प्रदेशातील सर्व 29 जागा जिंकून क्लीन स्वीप दिला आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसचे जीतू पटवारी यांनी कार्तिकेय यांच्या या वक्तव्यावरून निशाणा साधत म्हटले की, याचा अर्थ असा आहे की दिल्ली घाबरलेली आहे आणि पक्षामध्ये असंतोष आहे.

kartikeya Chouhan
J. P. Nadda : जे. पी. नड्डा यांना मंत्रिपदासह आणखी मोठी नवी जबाबदारी मिळणार

कार्तिकेय चौहान यांनी म्हटले होते की, 'बुधनीच्या जनतेने अद्भुत संदेश देण्याचं काम केलं आहे. जगाने आपली खूप परीक्षा बघितील आहे. मी तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये आणि केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यामध्ये कोणताच फरकत बघत नाही. आपण सर्वजण अनेक शरीर जरी असलो तरी एक जीव आहोत.'

kartikeya Chouhan
Modi Cabinet Portfolio Announcements : मोदींची 'नो रिस्क',खाती फिक्स; अमित शाह,राजनाथ सिंह,गडकरी,चौहान सांभाळणार 'ही' महत्त्वाची खातं

तसेच 'मी आताच दिल्लीत राहून परतलो आहे. याआधीही आपले नेते (शिवराजसिंह चौहान) मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय होते. परंतु आता ते मुख्यमंत्री नाहीत तरीही अधिकच लोकप्रिय झाले आहेत. एवढ्या प्रचंड मोठा विजय मिळवून गेल्यानंतर संपूर्ण दिल्लीही नतमस्तक झाली आहे. संपूर्ण दिल्ली आज त्यांना ओळखते आणि त्यांचा सन्मान करते आहे.' असंही कार्तिकेय यांनी यावेळी सांगितलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com