J. P. Nadda : जे. पी. नड्डा यांना मंत्रिपदासह आणखी मोठी नवी जबाबदारी मिळणार

BJP Political News : येत्या अधिवेशनात नड्डा यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची सूत्रांनी सांगितले.
J. P. Nadda
J. P. NaddaSarkarnama

New Delhi Political News : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यावर पुन्हा नवी जबाबदारी देण्यात येणार आहे. नड्डा यांना राज्यसभेतील नेता बनवले जाण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

येत्या अधिवेशनात नड्डा यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची सूत्रांनी सांगितले. यापूर्वी राज्यसभेत पीयूष गोयल हे नेते होते. मात्र ते लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने ती जागा रिक्त आहे.

राज्यसभेचे खासदार असलेल्या नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या Narendra Modi तिसऱ्या कार्यकाळात मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांना रसायन आणि खते मंत्रालयाचा कार्यभारही देण्यात आलेला आहे.

दरम्यान, नड्डा यांच्याकडे 2020 मध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद देण्यात आले होते. आता त्यांच्याकडे मंत्रि‍पदासह राज्यसभेचे नेते पद दिले तर अध्यक्ष म्हणून ते काही महिने काम करण्याची शक्यता आहे.

कोण आहेत नड्डा?

जे. पी. नड्डा, यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. त्यांचा राजकीय प्रवास ABVP, RSS ची विद्यार्थी शाखेतून झालेला आहे. 1991 मध्ये ते पक्षाच्या युवा शाखा, भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते बनले.

ते 2012 मध्ये पहिल्यांदा हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर 2014 मध्ये अमित शहा Amit Shah यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले त्यावेळी नड्डा भाजपच्या संसदीय मंडळाचे सदस्य बनले.

J. P. Nadda
Bachchu Kadu On Devendra Fadnavis : पंकजाताईंसाठी फडणवीसांच्या कार्यवाहीचं नवल नाही; बच्चू कडू असं का म्हणाले...

यापूर्वी त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभेत आमदार म्हणूनही काम केले आहे. 1993, 1998 आणि 2007 असे तीन वेळा त्यांनी बिलासपूरची जागा जिंकली आणि 1998 ते 2003 या काळात आरोग्य मंत्री म्हणून काम केले.

या वर्षी एप्रिलमध्ये ते गुजरातमधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले. तर पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये नड्डांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडली. तसेच पीयूष गोयल Piyush Goyal यांच्यानंतर त्यांच्याकडे राज्यसभेचे नेते पद देण्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

J. P. Nadda
Video Ramesh Kuthe News : गोंदियात भाजपला मोठा झटका; माजी आमदार रमेश कुथे यांचा राजीनामा....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com