Delhi Legislative Assembly Session 2025: दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची उद्या पहिली परीक्षा; कॅगचा अहवाल सादर होणार

Delhi Assembly First Session: दिल्लीच्या आठव्या विधानसभेचे पहिले सत्र 24 फेब्रुवारी रोजी अकरा वाजता सुरु आहे. सकाळी नवनियुक्त आमदारांचा शपतविधी सोहळा होणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता अध्यक्षांची निवड होणार आहे.
Delhi Assembly First Session:
Delhi Assembly First Session:Sarkarnaa
Published on
Updated on

Delhi Vidhan Sabha Session: दिल्ली विधानसभा अधिवेशनचे उद्यापासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीएजीचा (CAG) अहवाल सादर करण्यात येणार आहे. यावरुन सत्ताधारी भाजप आणि विरोधकामध्ये खडाजंगी रंगणार आहे.

आम आदमी पक्ष आणि भाजप नेत्यांमध्ये सीएजीवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातच भाजपने मतदारांशी याबाबत आश्वासन दिले आहे. सत्तेत आल्यावर पहिल्या अधिवेशनात सीएजीचे अहवाल सादर केला जाईल, असे भाजपने सांगितले आहे.

दिल्लीच्या आठव्या विधानसभेचे पहिले सत्र 24 फेब्रुवारी रोजी अकरा वाजता सुरु आहे. सकाळी नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता अध्यक्षांची निवड होणार आहे. आम आदमी पार्टीच्या कार्यकाळातील कामाबाबत कॅगचा अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर त्यावर चर्चा होईल.

Delhi Assembly First Session:
Maharashtra Politics News live : कर्नाटकला जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा आदेश

दिल्ली विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात भाजप कॅगच्या अहवालावर चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनासाठी आज भाजपच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य दिल्लीतील पक्ष कार्यालयात यासाठी उपस्थित राहणार आहेत.

कॅगचा अहवाल हा सरकार आणि जनता यांच्यासाठी महत्वाचा असतो. सरकारचा पैसा योग्य पद्धतीने खर्च झाला की नाही, सरकारी विभागावर किती पैसा खर्च झाला, योजनावर किती पैशा खर्च झाला. याचा लेखाजोथा कॅगच्या अहवालात मांडला जातो.

या खर्चात काही गैरव्यवहार झाला तर कॅगकडून त्यावर ताशेरे ओढले जातात. गेल्या सरकारच्या काळात सादर झालेला कॅगल्या अहवालावरून अनेक योजनामध्ये भष्ट्राचार झाल्याचे उघड झाले होते. त्यावर राजकारण तापलं होते. सत्ताधारी आपला विरोधकांनी धारेवर धरलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com