Nimisha Priya: निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द? ग्रँड मुफ्ती कार्यालयाचा दावा भारत सरकारनं फेटाळला

Nimisha Priya Kerala Nurse Death Penalty: केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने शिक्षा रद्द केल्याची माहिती चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अपुरी माहिती आहे. सध्या निमिषाची फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली असून ती अजूनही कायम आहे.
Nimisha Priya Kerala Nurse Death Penalty Canceled Yemen
Nimisha Priya Kerala Nurse Death Penalty Canceled YemenSarkarnama
Published on
Updated on

येमेनमध्ये भारतीय परिचारिका निमिषा प्रियाला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा माफ करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. भारतातील सुन्नी नेते कंथापुरम ए. पी. अबूबक्कर मुस्लियार म्हणजे ग्रँड मुफ्ती यांनी याबाबतचा दावा केला होता. हा दावा भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळला आहे.

ही बातमी चुकीची असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. सोमवारी मध्यरात्री भारतीय ग्रँड मुफ्ती कांतापुरम एपी अबूबकर मुसलियार यांच्या कार्यालयाने निमिषाला माफी मिळाल्याचा दावा केला होता. म्हणजेच यापुढे त्याला फाशीची शिक्षा होणार नाही. मात्र, याबाबत अद्याप लेखी आदेश आलेला नाही, असा दावा मुसलियार यांच्या कार्यालयाने केला आहे.

त्यांच्या या दाव्यानंतर केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने शिक्षा रद्द केल्याची माहिती चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अपुरी माहिती आहे. सध्या निमिषाची फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली असून ती अजूनही कायम आहे.

Nimisha Priya Kerala Nurse Death Penalty Canceled Yemen
Pune Rave Party: खडसेंच्या जावयाला जेल की बेल; पुणे पोलीस कोर्टात युक्तीवाद करणार

निमिषा प्रिया ही केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील कोलेनगोडयेथील रहिवासी आहे. ती नर्स आहे. २००८ मध्ये नोकरीच्या निमित्ताने ती येमेनला गेली आणि सना येथील सरकारी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती. २०११ मध्ये तिने टॉमी थॉमसशी लग्न केले आणि दोघेही येमेनमध्ये राहत होते.

निमिषाने काही वर्षांपूर्वी तलाल महदीला एक इंजेक्शन दिले होते. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. तलाल महदी हा निमिषाचा बिझनेस पार्टनर होता.निमिषा ही आपली पत्नी असल्याचे तो सर्वत्र सांगायचा आणि तिचा छळ करत होता. निमिषाने भारतात जाऊ नये, म्हणून त्याने तिचा पासपोर्ट देखील जप्त केला होता आणि निमिषाला तोच हवा होता, यामुळे त्याच्यात वाद झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com