Kolkata Rape And Murder Case: कोलकाता प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई; 'आरजी कार'च्‍या माजी प्राचार्यांच्या अडचणी वाढणार

CBI Action On Sandip Ghosh : कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याची घटनेची सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेतली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान बंगाल सरकार आणि रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
Sandip Ghosh And CBI.jpg
Sandip Ghosh And CBI.jpgSarkarnama
Published on
Updated on

Kolkata News : कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. त्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेमुळे पश्चिम बंगालमधील वातावरण तापलं आहे.या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला असून सर्वोच्च न्यायालयाने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अशातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरुद्ध अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने आता घोष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोलकाता उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आले आहे. त्यामुळे संदीप घोष यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एफआयआर दाखल करून भ्रष्टाचाराचा तपास सुरू केला असल्‍याचे वृत्त ANI ने दिले आहे.

Sandip Ghosh And CBI.jpg
MVA News : मविआत तिढा, नवाब मलिकांच्या विरोधात कोण उमेदवार असणार? ठाकरे गटाची मोठा मतदारसंघ सोडण्याची तयारी

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची पहिल्यापासूनच भूमिका संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. सीबीआयच्या सध्या ते टार्गेटवर असून त्‍यांची सलग सहा दिवस चौकशी करण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे.

संदीप घोष यांनी चौकशीवेळी केलेली विधानं ही परस्‍परविरोधी असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. सर्वोच्‍च न्‍यायालयानेही घोष यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सीबीआयकडून माजी प्राचार्य संदीप घोष,आरोपी संजय रॉय आणि अन्य चार डॉक्टर आणि एका सिव्हिल व्हॉलंटियरची पॉलिग्राफ चाचणी करण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. विशेष न्यायालयाने सीबीआयची पॉलिग्राफ चाचणीची मागणी मंजूर केली. यानंतर माजी प्राचार्यांसह सात जणांची पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली.

सरन्यायाधीशांचा सरकार, प्रशासनावर संताप

कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याची घटनेची सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) गंभीर दखल घेतली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान बंगाल सरकार आणि रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अनेक प्रश्नांचा भडिमार कोर्टाने केला.

प्राचार्य संदीप घोष काय करत होते, वेळेत गुन्हा दाखल का झाला नाही, आई-वडिलांना पीडितेचा मृतदेह उशिरा का दिला, पोलिस काय करत होते, गंभीर गुन्हा असताना आंदोलनकर्त्यांना रुग्णालयात कसे घुसू दिले, असे अनेक प्रश्न करत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी बंगाल पोलिसांच्या सुरूवातीच्या तपासावर साशंकता व्यक्त केली.

Sandip Ghosh And CBI.jpg
Balasaheb Thorat News : 'राज्यात महिला सुरक्षित नाहीत, तरीही सत्ताधारी..' ; बाळासाहेब थोरातांचा महायुती सरकारवर निशाणा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com