Konrad Sangma News : कोनराड संगमांना डावलण्याचा डाव फसला; अखेर मेघालयात होणार सरकार स्थापन

Meghalay : मेघालयामध्ये सत्ता स्थापनेच्या जोरदार हालचाली सुरु आहेत.
Meghalaya News
Meghalaya NewsSarkarnama
Published on
Updated on

Meghalaya News : मेघालयामध्ये (Meghala) सत्ता स्थापनेच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. या दरम्यान मोठे राजकीय नाट्य रंगले आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या एनपीपीला बाजूला सारुन सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु होत्या. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे आता कोनराड संगमांचा (Konrad Sangma) मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तीन दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर रविवारी युनायटेड डेमोक्रॅटिक पक्ष (UDP) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (PDF) यांनी संगमा यांच्या एनपीपी पक्षासोबत युती करत सरकारला पाठिंबा दिला. दोन्ही पक्षांनी आपल्या समर्थनाचे पत्र संगमा यांना दिले. ही माहिती कोनराड संगमा यांनी ट्विटरवरुन दिली. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, ''युडीपी व पीडीएफ या पक्षांनी सरकारस्थापनेसाठी एनपीपीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार. राज्यातीलच दोन महत्त्वाच्या पक्षांची साथ मिळाल्यामुळे आता मेघालयच्या जनतेसाठी आम्हाला ठोस असे काम करणे शक्य होणार आहे.''

Meghalaya News
Manish Sisodia: मनीष सिसोदियांची होळी तुरुंगातच; २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

शनिवारपर्यंत युडीपी पक्ष तिसरी आघाडी स्थापन करून तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) आणि इतर पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली करत होता. यूडीपीला विधानसभा निवडणुकीत एनपीपी पक्षानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या ११ जागा मिळाल्या आहेत. सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ जुळवता आले नाही तर आम्ही विरोधात बसू असेही यूडीपीचे नेते म्हणत होते.

रविवारी अचानक यूडीपीने घुमजाव करत आपले समर्थन जुना सहकारी असलेल्या एनपीपीला दिले. युडीपीची भूमिका अचाणक बदल्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, मेघालयमध्ये २७ फेब्रुवारीला ५९ जागांसाठी मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकाही पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या.

निकालाच्या काही तासांतच दोन जागा जिंकणाऱ्या भाजपने (BJP) एनपीपीला पाठिंबा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एनपीपीला आणखी दोन अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाला. त्यानंतर हिल स्टेट पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या या पक्षाच्या दोन आमदारांनीदेखील त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे एनपीपीकडे ३२ आमदारांचे संख्याबळ झाले होते. बहुमतासाठी ३१ आमदारांची गजर आहे.

त्यानंतर एचएसपीडीपीने घुमजाव करत एक निवेदन जाहीर केले. ज्यामध्ये त्यांच्या दोन आमदारांनी एनपीपीला दिलेला पाठिंबा अधिकृत नसल्याचे म्हटले होते. युडीपी पक्षाने सुरू केलेल्या युतीच्या प्रयत्नांमुळे एचएसपीडीपीने पाठिंबा काढून घेतल्याची चर्चा होती. एनपीपी आणि भाजपाविरोधी पक्षांना एकत्र करून एक नवी युती तयार करण्याचा प्रयत्न सुरु केला जात होता.

Meghalaya News
Former CM Rabri Devi: माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरावर सीबीआय'ची छापेमारी; काय आहे प्रकरण?

दरम्यान, संगमा यांनी जाहीर केले की, सत्तास्थापनेसाठी एनपीपी पक्षाला राज्यपालांकडून निमंत्रण आलेले आहे. त्याचवेळी युडीपीने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु होत्या. सत्तास्थापनेसाठीचे संख्याबळ आमच्याकडे आहे, असा दावा ते करत होते. दरम्यान, एचएसपीडीपीच्या आमदारांनी एनपीपीला पाठिंबा दिल्यामुळे आमदारांचे पुतळे जाळण्यात आले. एका आमदाराच्या कार्यालयाला आग लावण्याचाही प्रयत्न झाला होता.

त्यानंतर मात्र, संगमा दुसऱ्यांदा सरकार स्थापनेसाठी सज्ज झाले. एनपीपीला युडीपी व पीडीएफ यांनी पाठिंबा दिल्यानंतर आता संगमा यांच्याकडे ४५ आमदारांचे संख्याबळ झाले आहे. त्यामुळे मेघालयात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर आता सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com