Manish Sisodia: मनीष सिसोदियांची होळी तुरुंगातच; २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

AAP : सिसोदिया गेल्या आठ दिवसांपासून कोठडीत आहेत
Manish Sisodia
Manish Sisodia Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज राउज एवेन्यू न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने आज त्यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सिसोदियांची होळी तुरुंगातच जाणार आहे.

सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यावर कथित मद्य घोट्याळ्याचे आरोप आहेत. या प्रकरणी त्यांना सीबीआयने अटक केली. सिसोदिया गेल्या काही दिवसांपासून सीबीआयच्या कोठडीत आहेत.

Manish Sisodia
Konkan News : रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंची लाज काढली...

सिसोदियांची आज सीबीआय कोठडी संपली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्यांना आता २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सिसोदिया यांची कथित मद्य घोट्याळ्याप्रकरणी ८ तास चौकशी केल्यानंतर २६ फेब्रुवारीला सीबीआयने त्यांना अटक केली होती. सिसोदिया गेल्या ८ दिवसांपासून कोठडीत आहेत.

Manish Sisodia
Arvind Kejriwal : सिसोदियांनी भाजपात प्रवेश केला तर...; केजरीवालांचा मोदींवर घणाघात

सिसोदियांना अटक झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.

दरम्यान, सिसोदिया यांच्या अटकेनंतर 'आप'च्या कार्यकर्त्यांनी देशभर आंदोलनं केली. त्यानंतर 'आप'चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीही केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com