Nuclear Power Plant : भारताला हादरविणारी बातमी, सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाची संवेदनशील माहिती चोरीला

Kudankulam Nuclear Power Plant, data breach : रिलायन्स कंपनीकडून या प्रकल्पाच्या यूनिट-३ आणि यूनिट-४ च्या निर्मिती केली जात आहे. दोन्ही यूनिट पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे.
Kudankulam Nuclear Power Plant
Kudankulam Nuclear Power PlantSarkarnama
Published on
Updated on

India nuclear plant : भारताला हादरविणारी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाची गोपनीय माहिती लीक झाली आहे. तब्बल १९ हजार सर्वाधिक संवेदशनशील फाईल्ससह ८ लाख ५८ हजार फाईल्स डार्क वेबवर अपलोड करण्यात आली आहे. या माहितीमध्ये प्रकल्पातील काही ब्लूप्रिंट, पुरवठादारांची माहिती, बैठकांसह तपासणी अहवाल आदी माहिती सार्वजनिक झाली आहे.

तमिळनाडू येथील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाशी (KKNPP) संबंधित ही माहिती आहे. प्रकल्पाशी संबंधित महत्वाच्या फाइल्स डार्क वेबवर लीक झाल्याचा दावा वर्ल्ड लीक्स (World Leaks) या रॅमसमवेअर ग्रुपने केला आहे。लीक झालेला डेटा या प्रकल्पाचे कंत्राटदार असलेल्या अनिल अंबानी याच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

भारतामध्ये असलेल्या सात अणुऊर्जा प्रकल्पांपैकी कुडनकुलम येथील प्रकल्प सर्वात मोठा आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने सांगितले की, त्यांच्या डेटाची अंशत: चोरी झाली आहे. हा डेटा थर्ड पार्टी डेटा सेंटर सर्व्हीस प्रोव्हायडर योट्टाच्या सर्व्हरवर होता. याबाबतची माहिती केंद्र सरकारला देण्यात आल्याची माहितीही कंपनीने दिली आहे.

Kudankulam Nuclear Power Plant
Supriya Sule news : अमित शहांसोबतच्या बैठकीत काय ठरलं होतं? फेररचनेच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळेंनी जाहीर केली भूमिका

रिलायन्स कंपनीकडून या प्रकल्पाच्या यूनिट-३ आणि यूनिट-४ च्या निर्मिती केली जात आहे. दोन्ही यूनिट पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यातून दोन हजार मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. याच दोन्ही यूनिटची संवेदनशील माहिती लीक झाली आहे. या माहितीमध्ये विम्याचीही माहिती आहे. कागदपत्रांमध्ये कथितपणे असा उल्लेख आहे की, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने असा विमा काढला आहे, ज्यामध्ये दोन्ही यूनिटवर दहशतवादी हल्ला झाल्यास ११.२ कोटी डॉलरपर्यंतच्या विम्याचा दावा केला जाऊ शकतो.

Kudankulam Nuclear Power Plant
FDA news : तुकाराम मुंढे यांच्या विभागातील रिक्त पदे पाहून बसेल धक्का; 'MPSC'नेच केली सरकारची पोलखोल...

आज तकच्या वृत्तानुसार, एनपीसीआयएल याबाबत रिलायन्सशी संपर्कात आहे. भारताची सायबर सुरक्षा एजन्सीही या घटनेचा तपास करत आहे. याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, वर्ल्ड लीक्स ग्रुपने यापूर्वीही नाईकी आणि टाटा समूहाला टार्गेट केले होते. जून महिन्यात या ग्रूपने दावा केला होता की, टाटा समुहाच्या चोरलेल्या डेटाच्या बदल्यात १५ लाख डॉलर खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्याने डेटा सार्वजनिक करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com