लडाख बस दुर्घटना : साताऱ्यातील विजय शिंदे यांचाही मृत्यू ,विसापूर गावावर शोककळा

अपघातात ७ जवानांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.
ladakh bus accident
ladakh bus accident sarkarnama
Published on
Updated on

सातारा : लडाख प्रदेशात २६ सैनिकांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात (adakh bus accident) सात जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे (vijay shinde) यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. काल सायंकाळी त्यांच्या मृत्यूची माती मिळताच विसापूर गावावर शोककळा पसरली आहे. (ladakh bus accident news)

या अपघातात अनेक जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर लगेचच जवानांची सुटका करण्यात आली. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले. थॉईसपासून सुमारे २५ किमी अंतरावर हा अपघात झाला.

लष्कराचे वाहन सुमारे ५० ते ६० फूट खोलवर श्योक नदीत पडले. सर्व २६ जवानांना परतापूर येथील ४०३ फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली. आतापर्यंत ७ जवानांना मृत घोषित करण्यात आले आहेत.

ladakh bus accident
माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना चार वर्षांचा तुरुंगवास

शुक्रवारी २६ जवानांना घेऊन बस परतापूरच्या शिबिरातून बस हनिफच्या पुढच्या ठिकाणी ही बस चालली होती. त्याचवेळी हा अपघात झाला. रस्त्यापासून नदीची खोली ५० ते ६० फूट आहे. त्यामुळे या बसमध्ये बसलेले सगळे जवान जखमी झाले. यापैकी सात जवानांचा मृत्यू झाला.

ladakh bus accident
आमच्यावर टीका झाली तरी तुमचा तोल ढळू देऊ नका ; अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला

शुक्रवारी सकाळी ९ वाजता जवानांचा हा ट्रक परतपूर येथील ट्रांजित कॅम्पवरुन हानिफ सेक्टरकडे जात होता.जेव्हा हा ट्रक थोईसपासून २५ किलोमीटर दूर आला तेव्हा ट्रकचालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रक ५० ते ६० फूट खोल श्योक नदीत पडला. या अपघातात ७ जवानांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com