Security Breach in Parliament : संसदेतील घुसखोरीचा (Security Breach in Lok Sabha) मास्टरमाईंड असलेल्या ललित झा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. चार आरोपींनी संसदेत घुसखोरी केल्यानंतर ललित झा यानं या घटनेचा व्हिडिओ त्याच्या एनजीओ पार्टनरला पाठवला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. ललित झा दिल्ली पोलिसांना शरण आला आहे.
संसदेच्या आत आणि बाहेर गेलेल्या चौघांचे मोबाईल घेऊन पळून गेलेला व्यक्ती ललित झा हाच होता असे तपासात समोर आले होते. ललित दिल्लीतून राजस्थानमध्ये पळून गेला होता. तेथे तो त्याचा मित्र महेशला भेटला. महेशला या कटाची माहिती होती. ललित महेशसोबत दिल्ली पोलिसांना शरण आला आहे.
राजस्थानहून दिल्लीत येण्यापूर्वी ललितने येथील चार मोबाईव नष्ट केले आहे.संसद घुसखोरी प्रकरणात सागर, विक्रम, ललित, मनोरंजन, नीलम अशी सहा जणांची नावे समोर आली आहेत. ललितने संसदेबाहेर स्मोक कॅन फोडतानाचे व्हिडिओ बनवले आणि बंगालमध्ये एनजीओ चालवणाऱ्या नीलाक्षकडे पाठवले. नीलाक्षने पोलिसांना सांगितले,
ललित एप्रिलमध्येच एनजीओमध्ये सामील झाला होता ललितला या घटनेचे फेसबुक लाइव्ह करायचे होते. ललितने ४ आरोपींचे मोबाईल आपल्याजवळ ठेवले होते. पोलिसांनी कोर्टात सांगितले, आरोपींकडे मोदींविरोधात आक्षेपार्ह पत्रही सापडले.
ललित झा याने मार्चमध्ये मनोरंजनला संसदेची रेकी करण्यास सांगितले. सागर जुलैमध्ये संसद भवनात आला होता, पण आत जाऊ शकला नव्हता. मनोरंजन आणि सागर यांच्या लक्षात आले की, येथे बूट तपासले जात नाहीत. म्हणूनच बुटांमध्ये स्मोक कॅन लपवले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.