After Rahul Gandhi Disqualification, MLA Suspended: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याविरोधात काँग्रेस देशभर आक्रमक झाली असून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या दोन आमदारांना निलंबित करण्यात आले. आसाम विधानसभेत काल (बुधवारी) हा प्रकार घडला.
राहुल गांधी यांच्यावरील कारवाईवरील चर्चेसाठी स्थगन प्रस्तावाची मागणीवरुन सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष बिस्वजीत दैमारी यांनी तीन आमदारांचे निलंबन केले आहे.
यात काँग्रेसचे दोन,तर अपक्ष आमदाराचा समावेश आहे. अपक्ष आमदार अखिल गोगोई आणि काँग्रेसचे आमदार जाकिर हुसैन सिकदर आणि कमलाख्या डे पुरकायस्थ यांना अध्यक्षांनी निलंबित केलं आहे.
विरोधी पक्षनेते देवव्रत सैकिया म्हणाले, "आम्ही राष्ट्रपतींना याबाबत प्रस्ताव पाठविणार आहोत. संविधान वाचविण्यासाठी, संविधानाचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे म्हणजे संविधाच्या नियमाचे उल्लंघन करण्यासारखे आहे,"
स्थगत प्रस्तावावर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा म्हणाले, "न्यायालयाच्या निर्णयावर विधिमंडळाच्या सभागृहात चर्चा करणे हे आश्चर्यकारक आहे. सभागृहात गोंधळ घालण्याची कट काँग्रेस आमदारांच्या बैठकीत ठरला होता, याबाबत आम्हाला माहिती होती,"
मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर सभागृहात काँग्रेस, एआईयूडीएफ, सीपीआई-एम आणि अपक्ष आमदारांनी याला विरोध करुन गोंधळ घातला. त्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहाचे कामकाज अध्यक्षांना स्थगित करावे लागले.
'मोदी'आडनावावर वादग्रस्त विधान केल्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली आहे. सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली आहे.
या कारवाईला आव्हान देणारी याचिका काँग्रेसकडून दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात येत्या दोन दिवसात काँग्रेस न्यायालयात धाव घेणार आहे. याबाबतची याचिका तयार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.