पंधरा तासांच्या चौकशीनंतर लालू प्रसाद यादव सीबीआयला म्हणाले..

मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात रेल्वे भरतीमध्ये भष्ट्राचार केल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यावर नवा खटला दाखल करण्यात आला आहे.
 Lalu Prasad Yadav
Lalu Prasad Yadavsarkarnama
Published on
Updated on

पटना : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो 'सीबीआय'ने भ्रष्टाचार प्रकरणी शुक्रवारी(ता.२०) १७ ठिकाणांवर छापे (cbi raid ) टाकले. पंधरा तासांच्या चौकशीनंतर सीबीआयचे पथक येथून निघाले आहे. पटना येथे १५ तास, दिल्ली येथे ८ तास, गोपालगंज येथे ५ तास सीबीआयच्या पथकाने चौकशी केली. (Lalu Prasad Yadav cbi raid news updates)

दिल्लीहून बिहारच्या विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. हे छापे जमीन घेऊन रेल्वेत नोकरी देण्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील 'यूपीए' सरकारमध्ये लालू यादव रेल्वेमंत्री होते. लालू प्रसाद यादव, त्याची पत्नी राबडीदेवी, मुलगी मीसा भारती, हेमा यादव यांच्यासह १६ जणांच्या विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे.

नोकरी देण्याच्या आमीषाला बळी पडलेले सर्व जणांचीही चौकशी सीबीआयने केली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात रेल्वे भरतीमध्ये कथित अनियमितता केल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचा नवा खटला दाखल करण्यात आला आहे. यानंतर सीबीआयने कारवाई सुरू केली.

 Lalu Prasad Yadav
नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; ईडीच्या आरोपपत्राची विशेष कोर्टाकडून दखल

तेजप्रताप यादव यावेळी उपस्थित होते. विधानसभा विरोधी पक्षनेता तेजस्वी यादव सध्या लंडन येथे आहेत. राबड़ीदेवी यांच्या निवासस्थानातून सीबीआयच्या पथकाने काही कागदपत्र जमा केली आहेत. यात जमीन खरेदीबाबतचा व्यवहाराचे हे कागदपत्र असल्याचे समजते.

पंधरा तास चौकशी केल्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लालू प्रसाद यादव यांना त्यांच्यावरील आरोपांबाबत विचारले असता ते म्हणाले, "मला काहीही आठवत नाही,"

 Lalu Prasad Yadav
पंधरा दिवसापूर्वी शिवसेनेत गेलेले मनसेचे पंजाबी पुन्हा स्वगृही परतणार

राबडी देवीच्या पाटण्यातील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त होता. सीबीआयची टीम लालू यादव, त्यांची मुलगी मिसा आणि इतर नातेवाईकांची चौकशी केली. चारा घोटाळ्यात राजदच्या नेत्याला जामीन मिळाल्यानंतर काही आठवड्यांनंतरच हे प्रकरण समोर आले आहे.

यावर्षी एप्रिल मध्ये झारखंड उच्च न्यायालयाने लालू यादव यांना दहा लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. लालूंच्या वतीने उच्च न्यायालयात विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी जामीन याचिका दाखल करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com