Tej Pratap Yadav : मोठी बातमी : तेजप्रताप यादव पक्ष, कुटुंबाविरोधात सुप्रीम कोर्टाची पायरी चढणार?

Tej Pratap Yadav's Bold Stand on Political Identity : मागील महिन्यात तेजप्रताप यांची लालूंनी पक्षातून हकालपट्टी तर कुटुंबातून बेदखल केले आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठे वादळ उठले आहे.
Tej Pratap Yadav
Tej Pratap Yadav Sarkarnama
Published on
Updated on

Bihar Politics : बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. यावेळी त्यांनी थेट निर्वाणीचा इशाराच दिला आहे. यावेळी त्यांनी कुटुंब आणि पक्षालाही सोडलेले नाही. त्यामुळे ते बिहारच्या राजकारणात मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

मागील महिन्यात तेजप्रताप यांची लालूंनी पक्षातून हकालपट्टी तर कुटुंबातून बेदखल केले आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठे वादळ उठले आहे. तेजप्रताप यांनी सोशल मीडियात अनुष्का यादव या तरुणीसोबतच्या रिलेशनशिपबाबत माहिती दिली होती. त्यानंतर काही वेळातच त्यांनी ही पोस्ट डिलिटही केली होती. मात्र, त्यांना लालूंच्या रोषाला सामोरे जावे लागले.

लालूंनी त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करत कुटुंबातूनही बेदखल केल्याची घोषणा सोशल मीडियातूनच केली होती. त्यानंतर तेजप्रताप यांनी सोशल मीडियातूनच पक्षातील विरोधकांचा उल्लेख जयचंद असा करत इशारा दिला होता. आता पुन्हा एकदा ते आक्रमक झाले असून यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाचा उल्लेख केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Tej Pratap Yadav
Modi US visit : मोदींनी सगळ्या चर्चांमधली हवाच काढली; ट्रम्प यांचे निमंत्रण नाकारण्यामागे मुनीर नव्हेत, सांगितलं वेगळंच कारण...

तेजप्रताप यांनी गुरूवारी सोशल मीडियात एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी विरोधकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या संयमाला माझी कमजोरी समजणाऱ्यांनो, मला तुमची षडयंत्र माहित नाही, असं समजू नका. सुरूवात तुम्ही केली होती, शेवट मी करणार.

खोटेपणा आणि फसवणूक करून तयार केलेला हा चक्रव्यूह तोडण्यासाठी जात आहे. सत्य समोर येणार आहे, त्यासाठी तयार राहा. माझी भूमिका माझी प्रिय जनता आणि सुप्रीम कोर्ट निश्चित करेल, कोणताही पक्ष किंवा कुटुंब नव्हे, असा निर्वाणीचा इशारा तेजप्रताप यांनी दिला आहे.

Tej Pratap Yadav
Eknath Shinde rally news : पंतप्रधान मोदींनी श्रीकांत शिंदेंना दिलंय नवं नाव! मेळाव्यात बाप-लेकाचा उर भरून आला...

तेजप्रताप यांच्या या पोस्टमुळे ते कुटुंब आणि पक्षाला थेट सुप्रीम कोर्टात खेचणार, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यांनी पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाचा उल्लेख केला आहे. तसेच या पोस्टसोबत त्यांनी लालूप्रसाद यांच्या फोटोसमोर उभा राहिलेला त्यांचा फोटोही पोस्ट केला आहे. तेजप्रताप यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, याबाबत पुढील काही तासांतच स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com