Lalu Prasad Yadav Case : लालू प्रसाद यादव पुन्हा जेलमध्ये जाणार ? जामिनाविरोधात CBI सर्वोच्च न्यायालयात..

Lalu Prasad Yadav Case News : सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.
Lalu Prasad Yadav Case
Lalu Prasad Yadav Case Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : कथित चारा घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सीबीआयने लालू प्रसाद यादव यांच्या जामीनाविरोधात सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता, तो आता मंजूर करण्यात आला आहे. यावर सर्वोच्च न्यायालय २५ ऑगस्टला सुनावणी करणार आहे. यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

झारखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत केंद्रीय तपास यंत्रणेने आपल्या याचिकेत लालू यादव यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या बाजूने निकाल दिल्यास, येत्या काही दिवसांत लालूंना पुन्हा तुरुंगात जावे लागू शकते.

Lalu Prasad Yadav Case
Shirur Loksabha : आढळरावांविरोधात जुन्या मित्रानेच ठोकला शड्डू; ‘मी फक्त ‘मातोश्री’च्या आदेशाची वाट पाहतोय...’

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लालू प्रसाद यादव यांना झारखंड हायकोर्टातून जामीन मिळाला होता. 30 एप्रिल 2022 रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती. चारा घोटाळ्याशी संबंधित डोरंडा कोषागार प्रकरणात ते जवळपास तीन वर्षे तुरुंगात होते. त्यानंतर सीबीआयने झारखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.

काय प्रकरण आहे?

चारा घोटाळा हा १९९० ते ९५ या कालावधीत झाला आहे. लालू प्रसाद यादव सत्तेत असताना डोरंडा आणि इतर तिजोरीतून कोट्यवधी रुपये काढण्यात आल्याचा आरोप आहे. हे रुपये काढून जनावरांचा चारा व इतर खर्चाचा खोटा तपशील दाखवण्यात आला. त्यांच्यावर चारा घोटाळ्याशी संबंधित अनेक खटले सुरू आहेत.

Lalu Prasad Yadav Case
Solapur Loksabha Election : शरद पवारांनी मला सोलापूर लोकसभेची तयारी करायला सांगितले आहे; राष्ट्रवादी नेत्याचा गौप्यस्फोट

यातील पाच प्रकरणांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जामीन मंजूर करण्यात आला होता. जामिनावर सुटल्यानंतर लालू प्रसाद यांच्यावर सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपणही केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com