Railway Job Scam: नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरण; प्रश्न विचारताच राबडी देवी भडकल्या...

Rabri Devi News: राबडी देवींच्या चार तासांच्या चौकशीनंतर आज लालू प्रसाद यादवांची होणार चौकशी
Railway Job Scam |  Former CM Lalu Prasad And Rabri Devi
Railway Job Scam | Former CM Lalu Prasad And Rabri DeviSarkarnama
Published on
Updated on

Bihar News: नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणात सोमवारी सीबीआयने बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरावर छापेमारी केली. सीबीआयने राबडी देवींची जवळपास चार तास चौकशीही केली. पण तरीही त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सीबीआय आज लालू प्रसाद यादव यांची चौकशी करणार आहे. पण सध्या लालू प्रसाद यादव दिल्लीत आहेत. त्यांच्या नुकतीच परदेशात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे.

काही दिवसांपूर्वी सीबीआयने राबडी देवी यांना काल झालेल्या कारवाईची माहिती दिली होती. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच सीबीआयने त्यांच्या निवासस्थानी ही कारवाई केली अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

Railway Job Scam |  Former CM Lalu Prasad And Rabri Devi
CM Eknath Shinde : नातवाने हट्ट केला.. मग काय आजोबा मुख्यमंत्री निघाले हट्ट पूर्ण करायला

दरम्यान, चौकशीनंतर राबडी देवी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी बिहारच्या विधानभवनाकडे रवाना झाल्या. त्यावेळी त्यांना माध्यमांनी चौकशीसंदर्भात काही प्रश्न विचारले असता त्या चांगल्याच संतापल्या होत्या. तुमच्या घरी सीबीआयने कारवाई केली, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, मग आम्ही काय करायचं. सीबीआय आमच्याकडे येत-जात असते.

तर, बिहारमध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर या गोष्टी सुरुच राहतील, असे मी म्हणालो होत. पण जर तुम्ही भाजपसोबत जाल तर तुम्ही राजा हरिशचंद्र व्हाल. पण आम्हाला हरकत नाही. बिहारचे लोक सर्व काही पाहत आहेत, असा टीपण्णी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिली.

Railway Job Scam |  Former CM Lalu Prasad And Rabri Devi
Ramdas Athawale News: '' मोदींना हरवणं येड्या गबाळ्याचं काम नाही..''; रामदास आठवलेंचा उध्दव ठाकरेंना टोला

काय प्रकरण आहे?

२००४- २००९ च्या दरम्यान जेव्हा लालू यादव रेल्वे मंत्री होते. तेव्हा रेल्वेमधील गट डी नोकरीच्या बदल्यात लालू कुटुंबाला भेटवस्तू किंवा अगदी कमी किंमतीत जमीन मिळाली. नोकरीच्या बदल्यात जमीन या घोटाळ्याच्या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्यासह कुटुंबातील अनेक सदस्यांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपानुसार, लालू यादव रेल्वेत तात्पुरत्या स्वरुपात रेल्वेत नेमणूक करायचे आणि जमीन करार पूर्ण झाल्यावर नोकरीवर ते नियमित केले जायचे.

नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात, सीबीआयने ऑक्टोबरमध्ये दिल्लीत आरोपीविरूद्ध चार्जशीट दाखल केले होते. त्यानंतर न्यायालयाने १ मार्च रोजी इतर आरोपींना आणि लालु यादव, राबडी देवी, मुलगी मिसा भारती यांच्यासह इतर आरोपींना आदेश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com