महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेससह भाजपचाही धुव्वा

तमिळनाडूतील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने मोठा विजय मिळवला आहे.
BJP and Congress
BJP and Congress Sarkarnama

चेन्नई : तमिळनाडूतील (Tamil Nadu) महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत (Local Body Elections) सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. विरोधी अण्णाद्रमुकसह (AIADMK) काँग्रेस व भाजपचाही धुव्वा उडाला आहे. बहुतेक पालिकांमध्ये डीएमकेने एकहाती सत्ता काबीज केली आहे.

तमिळनाडूत काही महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत डीएमकेने अण्णाद्रमुक व भाजप (BJP) आघाडीला पराभूत करून पुन्हा सत्ता मिळवली. त्यानंतर राज्यात पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली. या निवडणुकीतही विधानसभेची (Assembly Election) पुनरावृत्ती झाली आहे. दुपारी तीन वाजेपर्यंतच्या निकालात डीएमकेने सर्व २१ महापालिकांमध्ये सत्ता मिळवण्याच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली आहे. डीएमकेचे २२७ उमेदवार विजयी झाले असून अण्णाद्रमुकला केवळ ३९ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला (Congress) २२ आणि भाजपला एका जागेवरच समाधान मानावे लागले आहे. (Local Body Elections Result)

BJP and Congress
कुणीही धुतल्या तांदळासारखं नाही! सर्वोच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं

नगरपालिकांच्या निवडणुकीत डीएमके १३८ पैकी १३२ ठिकाणी आघाडीवर आहे. आतापर्यंत डीएमकेचे ९८७ उमेदवार विजयी झाले असून इतर पक्ष जवळपासही नाहीत. अण्णाद्रमुक २६५, काँग्रेस ६३ तर भाजपला केवळ २४ जागा मिळाल्या आहेत. नगर पंचायतींमध्येही तीच स्थिती आहे. एकूण ४८९ पंचायतींपैकी ३९१ ठिकाणी डीएमके एकहाती सत्ता मिळवण्याची शक्यता आहे.

नगर पंचायतीच्या निवडणुकीत आतापर्यंत डीएमकेला ३ हजार ४७८ जागा मिळाल्या आहेत. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णाद्रमुकला एक हजारचाही आकडा पार करता आलेला नाही. या पक्षाला ९५७ जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेसला २२५ आणि भाजपला १०० चा आकडा गाठता आला. इतर पक्षांचे उमेदवार व अपक्षांना जवळपास एक हजार जागा मिळाल्या आहेत.

अनेक नगर पालिकांमध्ये डीएमकेने इतर पक्षांचा सुफडा साफ केल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत डीएमके, काँग्रेस व अन्य काही पक्षांची आघाडी आहे. तिरूपूर जिल्हयातील सर्व पालिकांमध्ये या आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच चेन्नई महापालिका कोईम्बतूर जिल्ह्यातील बहुतेक नगर पालिकांचाही यामध्ये समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com