कुणीही धुतल्या तांदळासारखं नाही! सर्वोच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा दिलासा दिला.
Supreme Court
Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Parambir Singh) यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा दिलासा दिला. न्यायालयाने परमबीरसिंह यांच्यावरील सर्वप्रकारची कारवाई नऊ मार्चपर्यंत थांबवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहे. पण हे आदेश देताना न्यायालयाने कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही, अशी टिप्पणी परमबीरसिंह यांच्यासह ठाकरे सरकारला फटकारलं.

परमबीरसिंह यांच्यावर राज्यात भ्रष्टाचार व खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये त्यांचा जबाबही घेण्यात आला आहे. पण ही सर्व प्रकरणे चौकशीसाठी सीबीआयकडे देण्याची मागणी परमबीरसिंह यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) करण्यात आली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. याप्रकरणी न्यायालयाने आधीही परमबीरसिंह यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले होते.

Supreme Court
सुप्रिया सुळेंसह गावित, बारणे ठरले संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायाधीश एस. के. कौल म्हणाले, आम्ही पुन्हा सांगू इच्छितो की, इथे गडबड आहे. यामध्ये कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही. राज्य प्रशासन आणि पोलीस व्यवस्थेत लोकांचा विश्वास ढळण्याची प्रवृत्ती आहे. ही सर्वात दुर्दैवी स्थिती आहे. पण कायद्याची प्रक्रिया सुरू राहायला हवी.

या प्रकरणाची पुढील सुनावणी नऊ मार्च रोजी होणार आहे. यावेळी परमबीरसिंह यांच्यावरील सर्व प्रकरणे सीबीआयकडे (CBI) चौकशीसाठी द्यायची किंवा नाही, याचा निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत सर्व प्रकरणांची चौकशी थांबवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, परमबीरसिंह यांनी मागील वर्षी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणीचे गंभीर आरोप केले होते. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिले होते. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली.

परमबीरसिंह यांनी काही दिवसांपूर्वीच निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याला पोलिस सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा दबाव होता असे म्हटले आहे. परमबीरसिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात हा धक्कादायक आरोप केला आहे. परमबीरसिंग यांच्या नव्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात वादळ उठले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com