ED Director Sanjay Mishra : 'ईडी'च्या मिश्रांना शेवटची संधी; तिसऱ्यांदा मिळाली मुदतवाढ

Supreme Court News : १५ सप्टेंबरपर्यंत पदावर राहणार कार्यरत
Sanjay Mishra
Sanjay MishraSarkarnama

Delhi News : विरोधकांचे घोटाळे बाहेर करून त्यांच्यावर कारावई करून घायकुतीला आणणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) संचालक संजय मिश्रा यांचा कार्यकाल वाढवण्याला सर्वोच्च न्यायालयाने अखेर मान्यता दिली आहे. यामुळे मिश्रा आता १५ सप्टेंबरपर्यंत या पदावर राहणार असल्याने विरोधकांना धडकी भरल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

'ईडी'चे संचालक संजय मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. यानुसार मिश्रा १५ ते १६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत या पदावर राहणार आहेत. मात्र, त्यानंतर त्यांना मुदतवाढ दिली जाणार नाही. या मुद्द्यावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायमूर्ती बी.आर. गवई, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठासमोर या मुद्द्यावर सुनावणी झाली.

Sanjay Mishra
Ahmednagar Politics: कर्जत-जामखेड 'एमआयडीसी'वरून राजकारण तापलं; राष्ट्रवादीचा ठिकठिकाणी 'रास्तारोको'

सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात काय म्हटले?

सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले, "सामान्य परिस्थितीत आमच्या अर्जावर सुनावणी होत नाही. परंतु व्यापक जनहित लक्षात घेऊन, आम्ही संजय मिश्रा यांना १५ सप्टेंबर २०१३ पर्यंत 'ईडी' संचालक म्हणून काम करण्यास परवानगी देण्यास इच्छुक आहोत. आम्ही स्पष्ट करतो की इतर कोणत्याही अर्जावर विचार केला जाणार नाही. १५-१६ सप्टेंबर २०२३ च्या मध्यरात्री ते 'ईडी' संचालक पदावरून पायउतार होतील."

'ईडी'ने असा केला युक्तीवाद

न्यायमूर्ती बी.आर.गवई यांनी विचारले, "एवढ्या मोठ्या संस्थेत एवढा मोठा मुद्दा हाताळणारा एकच अधिकारी आहे का? बाकीचे अधिकारी अजिबात पात्र नाहीत असे सरकार मानते का?" यावर 'ईडी'च्या वतीने मिश्रा यांच्याकडे 'फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स' या विषयांवर कौशल्य आहे. त्यांच्याअभावी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रयत्नांना फटका बसेल. जागतिक स्तरावर आर्थिक सुधारणांकडे यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या आपल्या देशाची प्रतिमा डागाळू शकते. त्यामुळे त्यांना १५ ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची सरकारला विनंती आहे."

Sanjay Mishra
Jitendra Awhad On Adivasi : आदिवासींच्या शुद्धीवरून आव्हाडांच्या शब्दांना 'चढलेली' धार सत्ताधाऱ्यांनी क्षणात 'उतरवली !'

याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय ?

याचिकाकर्त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, "या सरकारने सर्व काही एका अधिकाऱ्याच्या खांद्यावर टाकले आहे. सर्वच संस्थांमध्ये सक्षम अधिकाऱ्यांची कमतरता नाही. ईडीही प्रमुखांच्या अखत्यारीत आहे. मंत्रालयांना माहिती आहे, पण इथे 'फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स'च्या नावाखाली मनमानी सुरू आहे," असेही सिंघवी यांनी सांगितले.

कोण आहेत मिश्रा ?

संजय मिश्रा हे १९८४ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी (आयआरएस) आहेत. त्यांनी आयकराच्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासातही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळेच त्यांची 'ईडी' प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. 'ईडी'चे प्रमुख बनण्यापूर्वी मिश्रा यांची दिल्लीतील आयकर विभागात मुख्य आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com