Ahmednagar Politics: कर्जत-जामखेड 'एमआयडीसी'वरून राजकारण तापलं; राष्ट्रवादीचा ठिकठिकाणी 'रास्तारोको'

Political News: विधिमंडळातही कर्जत-जामखेड 'एमआयडीसी'चा मुद्दा चांगलाच गाजला आहे.
Karjat-Jamkhed MIDC
Karjat-Jamkhed MIDCSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News: कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार रोहित पवारांनी विधिमंडळाच्या बाहेर आंदोलन केले. त्यानंतर उद्योगमंत्र्यांनी अधिसूचना काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते आश्वासन न पाळल्याचा निषेध म्हणून शुक्रवारी मतदारसंघातील कर्जत, राशीन, खर्डा, जामखेड, मिरजगावमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने मतदारसंघात एक प्रकारे चक्काजाम झाल्याचे दिसून आले. खर्डा, जामखेडमार्गे बीड, नांदेडकडे जाणारी तर मिरजगावमध्ये रास्ता रोकोमुळे सोलापूर, दक्षिण भारताकडे जाणारी वाहतूक प्रभावित झाली. या सर्वच ठिकाणी रोहित पवारांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

Karjat-Jamkhed MIDC
Ahmednagar Politics : रोहित पवारांचे उपोषण, तर राम शिंदेचा आग्रह; अखेर कर्जत MIDC च्या जीआरची सामंतांची घोषणाच!

कर्जत-जामखेड मतदारसंघात युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी दोन्ही तालुक्याच्या मध्यवर्ती सीमेवर असलेल्या कर्जत तालुक्यातील पाटेगाव-खंडाळा या ठिकाणी नियोजित एमआयडीसी प्रस्तावित असून त्यासाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी यापूर्वीच पूर्ण झालेल्या आहेत. फक्त अधिसूचना काढणे बाकी असतानाही सरकार बदलल्याने श्रेयवादातून परवानगी मिळत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

Karjat-Jamkhed MIDC
Ahmednagar Politics : रोहित पवारांनी उचलून धरलेल्या कर्जत 'MIDC'मध्ये नीरव मोदीची एन्ट्री; शिंदेंच्या दाव्याने खळबळ !

राज्य सरकार रोहित पवारांना वेळोवेळी आश्वासन देऊनही पाळत नसल्याने सरकारचा निषेध म्हणून राष्ट्रवादीकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षं कर्जत-जामखेड मतदारसंघाचे ज्यांनी प्रतिनिधित्व केले त्यांनी कोणतेही प्रश्न सोडवले नसल्याचा आरोपही यावेळी आंदोलन कर्त्यांनी केला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com