रात्री उशीरा एकनाथ शिंदे - अमित शहांची गुप्त भेट? तर्क वितर्कांना उधाण

Eknath Shinde : कालची भेट वीस ते पंचवीस मिनिटांची होती. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Eknath Shinde & Amit Shaha
Eknath Shinde & Amit ShahaSarkarnama

दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांची काल (21 सप्टेंबर) रात्री उशीरा गुप्त भेट घेतल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. काल दुपारी दिल्लीत दाखल झालेल्या एकनाथ शिंदे यांनी रात्री उशीरा गुप्तपणे अमित शहांची भेट घेतली आहे. या गुप्त भेटीत वेदांता प्रकल्प, मुंबई महापालिका निवडणूक आणि राज्यातल्या महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. मात्र दोन्ही नेत्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली, यावर राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे आपल्या काही सहकाऱ्यांसह दिल्ली दौऱ्यावर होते. राज्यप्रमुखांच्या भेटीगाठीसाठी आलेल्या शिंदे यांचा अचानकपणे दिल्ली मुक्काम वाढला. रात्री साडे अकराच्या दरम्यान महाराष्ट्र सदनातून जाऊन त्यांनी ही भेट घेतलेल्याचे समजते आहे. काल रात्री दहा वाजताच ते परतनार होते. अचानक कार्यक्रमात बदल करून ते या भेटीसाठी रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे.

Eknath Shinde & Amit Shaha
माझ्या कुळाच्या उद्धाराने ठाकरेंचे नैराश्य दूर होत असेल तर तो सन्मानच : बावनकुळेंचं प्रत्युत्तर

आजही दिवसभर शिंदे हे दिल्लीत आहेत. आजही ते महत्त्वाच्या नेत्यांची भेटी घेणार असल्याची शक्यता आहे. ज्यावेळी निवडणुक आयोगाची तारीख असते, महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची तारीख जवळ असते, अशा वेळी शिंदे यांची दिल्लीवारी आणि भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची भेट होत असते. याकडे राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रीया उमटत असतात. कालची भेट ही साधरण वीस ते पंचवीस मिनिटांची होती. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com