Shivraj Patil Memorial: भाजप उभारणार काँग्रेसच्या दिग्गज दिवंगत नेत्याचे स्मारक; स्वतः CM फडणवीसांकडून घोषणा

Latur Municipal Corporation Shivraj Patil Chakurkar memorial:आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आपल्या भाषणात शिवराज पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात लातूरच्या नगराध्यक्ष पदापासून झाली. त्यामुळे लातूर महापालिकेत त्यांचे यथोचित स्मारक उभे केले जावे, अशी मागणी केली.
Shivraj Patil  chakurkar
Shivraj Patil chakurkar Sarkarnama
Published on
Updated on

सुशांत सांगवे

लातूर : सुसंस्कृत राजकारणाचा आणि निष्कलंक व्यक्तिमत्वाचा आदर्श घालून दिलेले माजी केंद्रिय गृहमंत्री व माजी राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांचे लातूरात स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. ७) येथे केली. हे स्मारक महापालिकेच्या आवारात उभे करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देईल, असेही फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.

महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने फडणवीस हे लातूर दौऱ्यावर आले होते. शिवराज पाटील यांचे नुकतेच निधन झाले. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी टाऊन हॉल येथे आयोजित सभेत स्मारक उभारण्याची घोषणा केली.

यावेळी माजी पालकमंत्री व आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आपल्या भाषणात शिवराज पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात लातूरच्या नगराध्यक्ष पदापासून झाली. त्यामुळे लातूर महापालिकेत त्यांचे यथोचित स्मारक उभे केले जावे, अशी मागणी केली.

Shivraj Patil  chakurkar
Mahapalika Nivadnuk: सतेज पाटलांनी सांगितला महापौरांचा कालावधी; कोल्हापुरात काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध

हा धागा पकडून बोलताना फडणवीस यांनी शिवराज पाटील यांच्या स्मारकाची घोषणा केली. शिवराज पाटील यांचे राजकीय आयुष्य पाहिले तर नगराध्यक्ष पदापासून लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत आणि राज्य सरकारमधील मंत्रीपदापासून देशाच्या गृहमंत्रीपदापर्यंत अशी पदे त्यांनी भूषवली. त्यांचे कार्य एका वेगळ्या उंचीवरील आहे. राजकारणात अशा व्यक्ती अत्यंत विरळ असतात. त्यांचे लातूरमध्ये स्मारक झालेच पाहीजे. स्मारकाचा योग्य आराखडा आमच्याकडे पाठवा. महापालिकेच्या निधीतून नव्हे; तर राज्यसरकारच्या निधीतून आम्ही हे स्मारक लवकरच उभे करू, असे फडणवीस यांनी सांगितले.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे, विलासराव देशमुख या राजकारणातील दोन मित्रांचे स्मारक लातूर जिल्हा परिषदेच्या परिसरात शेजारीशेजारी उभारण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com