Rajnath Singh : 'आयएनएस सूरत', 'आयएनएस निलगिरी' म्हणजे 'स्वदेशी' ताकद; मंत्री राजनाथ सिंह यांचा देशविघातक शक्तींना इशारा

Mumbai INS Surat INS Nilgiri Warship INS Vaghsheer submarine Union Defense Minister Rajnath Singh Navy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत झालेल्या युद्धनौक आणि पाणबुडीचे जलावतरणात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा दहशतवा दहशतवादी झाले.
Rajnath Singh
Rajnath SinghSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 'आयएनएस सूरत', 'आयएनएस निलगिरी' या युद्धनौकाचे आणि 'आयएनएस वाघशीर', या पाणबुडीचे जलावतरण झाले.

युद्धनौका आणि पाणबुडीमुळं इंडियन ओशनमध्ये समुद्रमार्गातील देशविरोधी शक्तींना अन् संरक्षणात देश आत्मनिर्भर होत असल्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. तसेच या वर्षांच्या अखेरपर्यंत देशाची तिन्ही संरक्षण विभाग अत्याधुनिक आणि वेगानं आत्मनिर्भर करणार असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "देशाच्या संरक्षणासाठी आत्मनिर्भर करणं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची प्राथमिकता राहिली आहे. याबाबत नेहमीच मार्गदर्शन राहिले आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्रात वाढलेल्या मनोबल हे त्याचे प्रतीक आहे. 'आयएनएस सुरत', 'आयएनएस निलगिरी' या युद्धनौका, तर 'आयएनएस वाघशीर' ही पाणबुडींमुळे भारताच्या नौदलाची समुद्रात, तर देशाची ताकद वाढवली आहे. हा क्षण ऐतिहासिक असून, त्याची नोंद सुवर्ण अक्षरानं होणार आहे".

Rajnath Singh
Torres Scam : टोरेसचं पुढचं 'टार्गेट' अन् 'ईडी' तपासासाठी मैदानात...

'इंडियन ओशन जिओ स्टॅटिस्टिकल आव्हानांबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहिले आहे. परंतु बदलत्या जागतिकरणामुळे इंडियन (INDIA) समुद्राच्या सीमांची सुरक्षितता अधिकच महत्त्वाची ठरते आहे. जे महत्त्वपूर्ण पूर्वमध्ये अटलांटिक समुद्राचे होते, आज तेच महत्त्व इंडियन समुद्रांकडे शिफ्ट झाले आहे. जगातील ट्रेडचा महत्त्वाचा हिस्सा या इंडियन समुद्राच्या मार्गे होतो. याशिवाय बदलत्या जागतिकरणामुळे इंडियन समुद्र हा आंतरराष्ट्रीय केंद्र बनलं आहे', असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

Rajnath Singh
Delhi Assembly Election : दिल्ली निवडणुकीसाठी भाजपचा प्लॅन सेट; जाणून घ्या मोदी - शाह किती रॅली करणार!

देशविघातक शक्तींना इशारा

'इंडियन ओशन हा ड्रग्स तस्करी, नार्कोस्टीक, तस्करी, अवैध मासेमारी, अवैध मानवी वाहतूक, दहशतवाद आणि अवैध हालचाली या समुद्र मार्गात होत असतात. भारताचा इंडियन समुद्रातील जिओ स्टॅटिस्टिकल आणि आर्थिक विस्तारावर लक्ष राहिले आहे. दोन हजार वर्षांपूर्वीच्या रोमशी असलेल्या ट्रेड व्यवहार, साऊथ ईस्टबरोबरचा व्यापार हे त्याचेच प्रतीक आहे. पूर्व अफ्रिकेचे क्षेत्राचा देखील व्यवहारात समावेश करता येईल. त्यामुळे इंडियन ओशनमधील सुरक्षितेला या युद्धनौका आणि पाणबुडी महत्त्वाच्या भूमिका पार पाडतील', असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर

'भारताच्या ट्रेडचा 95 टक्के हिस्सा इथून राहिला आहे. यामुळे इंडियन समुद्राच्या सीमाभागात नौदलाचे सशक्तीकरण महत्त्वाचे ठरते. आताच्या तीन अत्याधुनिक पाणबुड्यांच्या सज्जतेने आपण इंडियन समुद्रात महत्त्वाचं पाऊल ठेवलं आहे. यामुळे पंतप्रधानांचे रक्षा मंत्रालयाला होत असलेल्या मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरते. देशाच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेचे होत असलेले कार्यावर सतत काम सुरू आहे', असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

युद्धनौकांची स्वदेशी बांधणी

''आयएनएस सुरत' आणि 'आयएनएस निलगिरी' या युद्धनौकेची 75 टक्के बांधणी स्वदेशी आहे. याशिवाय देशाच्या संरक्षण निर्मितीत स्वदेश निर्मित यंत्रणांचा वापर वाढवण्यात येत आहे. सक्षमपणे कोणत्याही परिस्थिती समोरे जाण्याची आपण तयारी ठेवलेली आहे. नौदल अधिक सक्षमपणे अत्याधुनिकपणे सज्ज होत आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्रात अतिशीघ्र कृतीपणा अधिक भर दिला जात आहे. या वर्षांच्या अखेरपर्यंत देशाच्या तिन्ही दलात अत्याधुनिक बदल होऊन, ते सज्ज होतील', असा विश्वास राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com