Delhi Assembly Election : दिल्ली निवडणुकीसाठी भाजपचा प्लॅन सेट; जाणून घ्या मोदी - शाह किती रॅली करणार!

BJP Plan Delhi Elections : दिल्लीतील निवडणुकीत एककडे सत्ताधारी आम आदमी पार्टी तर दुसरीकडे केंद्रातील सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष आम आदमी पार्टी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
PM Narendra Modi, Amit Shah
PM Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा प्लॅन सेट झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन ते चार प्रचार रॅली घेणार आहेत. यामध्ये एक रॅली उत्तर पश्चिम दिल्ली, दुसरी रॅली उत्तर पूर्व दिल्ली आणि तिसरी रॅली दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम दिल्लीत होईल.

असंही म्हटलं जात आहे की, पंतप्रधान दिल्लीत एक मेगा रोड शो देखील करू शकतात. मात्र कुठे आणि कधी होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र एवढं निश्चित मानलं जात आहे की रॅली आणि रोड शो ची सुरुवात २० जानेवारी नंतर होईल.

पंतप्रधान मोदीनी (PM Modi) मागील काही दिवसांमध्ये दिल्लीत रोहिणीत एका सभेला संबोधित करताना, निवडणूक प्रचाराचा बिगुल फुंकला होता. या आधी पंतप्रधानांनी दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्यातील जनकपुरी पश्चिम-कृष्णा पार्क एक्सटेंशन खंडाचे उद्घाटन केलं आणि रिठाला-नरेला-कुंडली कॉरिडोरचे भूमीपूजन केले होते. रोहिणीच्या रॅलीत पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारवर टीका केली होती आणि आम आदमी पार्टीला आपदा संबोधलं होतं.

PM Narendra Modi, Amit Shah
PM Modi News : 'मी पण गच्चीवर जाऊन पतंग उडवायचो...' मोदींनी दिला आठवणींना उजाळा!

पंतप्रधान मोदींशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दिल्लीत सात पेक्षा अधिक रॅली करू शकतात. याचसोबत शाह दिल्लीत चार ते पाच रोड शो देखील करू शकतात. असा अंदाज वर्तवला जात आहे की, अमित शाह त्यांच्या रोड शोची सुरूवात १७ जानेवारी होईल. आतापर्यंत अमित शाह यांनी कोणत्याही प्रचारसभेला संबोधित केले नाही, परंतु विविध कार्यक्रमातून दिल्ली निवडणुकीबाबत प्रतिक्रिया देताना आम आदमी पार्टीवर टीका केलेली आहे.

PM Narendra Modi, Amit Shah
Lawrence Bishnoi Threat to Minister : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मंत्र्याला धमकी; क्यूआर कोड पाठवून मागितली 30 लाखांची खंडणी!

दिल्लीतील निवडणुकीत एककडे सत्ताधारी आम आदमी पार्टी तर दुसरीकडे केंद्रातील सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष आम आदमी पार्टी (AAP) अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे आणि उमेदवारी याद्याही जाहीर होत आहेत.

भाजप आम आदमी पार्टीकडे दहा वर्षांतील कामांचा हिशोब मागत आहे. तर काँग्रेस दिल्लीची सत्ता पुन्हा एकदा काबिज करण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहे. शीला दिक्षीत यांच्या कार्यकाळात दिल्ली कशी होती आणि आता आम आदमी पार्टीच्या काळात दिल्लीची काय अवस्था झाली आहे, याबाबत काँग्रेसकडून जनतेला सांगितलं जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com