
Lawrence Bishnoi gang threatens Upendra Kushwaha - राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष, राज्यसभा सदस्य आणि एनडीए आघाडीचे भागीदार उपेंद्र कुशवाह यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे, उपेंद्र कुशवाह यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या असल्याचे कुशवाह यांनी एक्सवर पोस्टद्वारे सांगितले आहे. उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले आहे की, विविध नंबरवरून सातवेळा आलेल्या धमकीच्या कॉलमध्ये त्यांना दहा दिवसांमध्ये ठार मारलं जाईल, असं म्हटलं गेलं आहे.
१९ जून रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये कुशवाह यांनी म्हटले की, आज रात्री ८.५२ ते ९.२० दरम्यान मला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने +९१६३०५१२९१५६ आणि +९१९२२९५६७४६६ या मोबाईल क्रमांकांवरून सलग सात धमकीचे कॉल आले.
तसेच, रात्री ८:५७ वाजता +९१७५६९१९६७९३ या मोबाईल क्रमांकावरून एमएमएस/एसएमएसद्वारे असं सांगण्यात आले की, जर तुम्ही एका विशिष्ट राजकीय पक्षावर बोलत राहिलात तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. असं कुशवाह यांनी सांगितलं.
याचबरोबर कुशवाह म्हणाले की, धमकी देणाऱ्या कॉल आणि मेसेजमध्ये दहा दिवसांत जीवे मारू असा इशारा देण्यात आला होता. यानंतर त्यांनी एसएसपी पाटणा या प्रकरणाची दखल घेत दोषींवर कारवाई करण्याचे आवाहन केले. तसेच लोकशाही व्यवस्थेत अशा धमक्या अस्वीकार्य आहेत, असंही कुशवाह यांनी म्हटलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.