Nana Patole - निवडणुकीत 'फिक्सिंग' नव्हती, तर 'नियम-९३' का बदलला? ; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

Nana Patole to Centre Government- या बदलासाठी केंद्राने एवढी तत्परता दाखवत ४८ तासांच्या आत अधिसूचना का काढली? असाही सवाल पटोलेंनी केला आहे.
Nana Patole questions the Election Commission and Centre over changes to Rule 93, alleging hidden motives related to Maharashtra Assembly elections.
Nana Patole questions the Election Commission and Centre over changes to Rule 93, alleging hidden motives related to Maharashtra Assembly elections. sarkarama
Published on
Updated on

Nana Patole's Allegations Against Central Government - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक मॅचफिक्सिंग होती या राहूल गांधी यांच्या आरोपानंतर आता काँग्रेसने निवडूक आयोग आणि केंद्र सरकाराच्या विरोधात उघड भूमिका घेतली असल्याचे दिसून येते. निवडणुकीत फिक्सिंग नव्हती तर आयोगाने नियम-९३ का बदलला?, या बदलासाठी केंद्राने ४८ तासांच्या आत अधिसूचना का काढली? असे सवाल काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केले आहेत.

‘दाल मे कुछ तो काला‘ असल्याशिवाय कुठलेच सरकार एवढी तत्परता दाखवत नाही, या सरकाराला काही तरी लापवायचे आहे आणि निवडणूक आयोग त्यांना साथ देत असल्याचा थेट आरोप पटोले यांनी केला.

हरियाणा विधानसभेच्या निवडणूक निकालावर तेथील उमेदवारांना शंका होती. काही उमेदवार न्यायालयात गेले होते. हायकोर्टाने सीसीटीव्हीचे फुटेज उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचे आदेश आयोगाला दिले होते. याकरिता नियम ९३चा दाखला देण्यात आला होता. या नियमानुसार उमेदवारच नव्हे तर मतदारालासुद्धा निवडणूक प्रक्रिये संदर्भात काही शंका असल्यास माहिती मागता येत होती आणि ती देणे बंधनकारक होते.

Nana Patole questions the Election Commission and Centre over changes to Rule 93, alleging hidden motives related to Maharashtra Assembly elections.
Kolhapur Constituencies - ..तर कोल्हापूरकरांना ३ खासदार १३ आमदार मिळणार; नव्या मतदारसंघांचे संकेत!

या दरम्यान महाराष्ट्राची निवडणूक झाली. येथे पाच महिन्यात लाखोंच्या संख्येने मतदार वाढले. सायंकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतरही ७६ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे समोर आले आहे. येथेच शंकेची पाल चुकचुकली. विदर्भातून सुमारे अडीच डझन काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडणुकीत याचिका दाखल केल्या आहेत. सर्वांनी सीसीटीव्ही फुटेजसह इतरही माहितीची मागणी आयोगाकडे केली आहे. ही बाब भविष्यात अडचणीची ठरण्याची शक्यता दिसत असल्याने निवडणूक आयोगाने नियम -९३मध्ये बदल करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली अन् ती तत्काळ मान्य करण्यात आली.

सुधारित बदलाचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना ३० मे रोजी पाठवले आहे. नियमातील या बदलामुळे निवडणुकीचा सर्व डेटा ४५ दिवसांत डिस्ट्रॉय करण्याची मुभा आयोगाला मिळणार आहे. याशिवाय फक्त उमेदवारच आयोगाकडे माहिती मागवू शकणार आहे. हे केंद्र व निवडणूक आयोगाचे संगनमत आहे. आयोगाला आणि सरकारला निवडणुकीशी संबंधित अनेक गोष्टी लपवायच्या असल्याचे यावरू दिसून येते. या शिवाय पारदर्शकताही संपवायची असल्याचा दावा पटोले यांनी केला.

Nana Patole questions the Election Commission and Centre over changes to Rule 93, alleging hidden motives related to Maharashtra Assembly elections.
Devendra Fadnavis at Dehu : नारायण राणेंनंतर फडणवीसांना मिळालं मानाचं पान! , देहूतील पालखी प्रस्थान सोहळ्याला हजर राहणारे दुसरे मुख्यमंत्री

ही सरळसरळ लोकशाहीची हत्या आहे. मतदारांच्या अधिकारावर डाका आहे. या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहोच, सोबतच जनआंदोलन देखील छेडणार असल्याचे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, गिरीश पांडव प्रामुख्याने उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com