Karnataka Election 2023 : मतदानाच्या दोन दिवसापूर्वीच लिंगायत समाजाकडून मोठी मागणी ; अल्पसंख्याक समाजाचा..

Lingayat Saint Demanded Increasing Reservation : लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Lingayat Saint Demanded Increasing Reservation
Lingayat Saint Demanded Increasing Reservation Sarkarnama

Lingayat Saint Demanded Increasing Reservation : कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज (सोमवार) थंडावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या रोड शो मुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. (lingayat saint demanded increasing reservation further give minority status)

काँग्रेसने भाजपला स्थानिक मुद्द्यांवरून घेरल्याचेही दिसून आले. दुसरीकडे तिकीट वाटपानंतर बंडखोरी, नेतृत्वावरून संभ्रम, जुन्या नेत्यांनी दिलेली सोडचिठ्ठी, लिंगायत समाजाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. तर भाजपने बजरंगबलीचा मुद्दा उचलला आहे.

कर्नाटकमधील कुदालसंगम पंचमसाली पीठाचे संत बसव जय मृत्युंजय स्वामी यांनी मतदानाला दोन दिवस बाकी असताना लिंगायत समाजाला असलेल्या आरक्षणाचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली आहे. निवडणुकीनंतर राज्यात कुणाचेही सरकार आले तरी त्यांनी लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दांवर चर्चा करुन त्यांचे आरक्षण वाढवावे, अशी मागणी संत बसव जय मृत्युंजय स्वामी यांनी केली आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

Lingayat Saint Demanded Increasing Reservation
Karnataka Election 2023 : राहुल गांधींबाबत सोनिया चिंतीत ; त्यांची गॅरंटी कोण घेणार ? ; भाजपचा मिश्किल सवाल

लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात सिद्धारमैया सरकारने केंद्र सरकारला जैन आणि बौद्ध यांच्यासोबत लिंगायत समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा, यासाठी प्रस्ताव पाठवला होता. पण केंद्र सरकारने लिंगायत समाजाचा हा प्रस्ताव नामंजूर केला.

"येत्या काही दिवसात लिंगायत समाजाला अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळेल, अशी अपेक्षा जय मृत्युंजय स्वामी यांनी व्यक्त केली आहे. या मागणीसाठी पंचमसाली लिंगायत समाजाने ३२ महिने आंदोलन केले होते.

Lingayat Saint Demanded Increasing Reservation
Ajit Pawar News : मी दिल्लीला गेलो ?..पण मी..; अजितदादांकडून चर्चांना पूर्णविराम ; सांगितला आठवड्याभराचा कार्यक्रम..

दरम्यान, दोन दिवसापूर्वी कर्नाटकातील वीरशैव लिंगायत फोरमने काँग्रेसला खुला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत 'अच्छे दिन' येण्याची शक्यता आहे. वीरशैव लिंगायत फोरमने पाठिंब्याचे पत्र काँग्रेसला दिले आहे.

'लिंगायत वोट बँक'ला राज्यात फार महत्व आहे. १७ टक्के लोकसंख्या लिंगायत समाजाची आहे. यामुळे लिंगायत समाजाचे बीएस येदियुरप्पा यांना भाजपने मुख्यमंत्री पदावरुन हटवल्यानंतर त्याच समाजाच्या बसवराज बोम्मई यांना भाजपनं मुख्यमंत्रीपदी विराजमान केले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com