Delhi Liquor Scam : केजरीवालांची CBI चौकशी, कपिल सिब्बलांचे 'ते' भाकित खरं ठरलं...; Video पाहा

Kapil Sibal ON Kejriwal : आप आणि भाजपा यांच्यात आरोपांच्या फैरी झडत आहेत.
Kapil Sibal News
Kapil Sibal NewsSarkarnama
Published on
Updated on

Liquor Scam updates Kapil Sibal ON Kejriwal : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.

दिल्ली सरकारने मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आधीच दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे.

त्यानंतर आता केजरीवाल यांनाही समन्स बजावले आहे. त्यामुळे आता दिल्लीतल्या राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. मद्य विक्री धोरण प्रकरणी २६ फेब्रुवारीला मनिष सिसोदियांना अटक झाली आहे. त्यानंतर आप आणि भाजपा यांच्यात आरोपांच्या फैरी झडत आहेत.

Kapil Sibal News
BRS News : मोदींना शह देण्यासाठी विरोधक मोट बांधत असतानाच KCR यांचा मोठा दावा ; म्हणाले, 'केंद्रात पुढील सरकार... '

अरविंद केजरीवाल यांची रविवारी(१६ एप्रिल) चौकशी केली जाणार आहे. यावर राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी प्रतिक्रिया दिली आहे . त्यांनी टि्वट केलं आहे. "अरविंद केजरीवाल यांचा राजकीय प्रगती उंचावत असताना त्यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI)चौकशीसाठी बोलविणार. गेल्या वर्षभरात सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करीत आहे. यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन एकत्र येणे गरजेचे आहे. ही लोकशाहीची हत्या असल्याने त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे," असे सिब्बल यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Kapil Sibal News
Karnataka Election JDS News : माजी पंतप्रधानांच्या सुनेचं तिकीट कापलं..; वहीनींना डावलून सामान्य कार्यकर्त्यांला..

केजरीवाल यांना सीबीआयने बजावलेल्या समन्सवर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी ट्वीट करून टीका केली आहे. अत्याचाराचा अंत नक्कीच होणार असल्याचं ट्वीट करत त्यांनी भाजपावर टीका केली आहे.

आम आदमी पक्षाची ओळख ही भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्म घेतलेला पक्ष अशी आहे. पण गेल्या काही काळांमध्ये आमदार ते मंत्री असे अनेक लोक वेगवेगळ्या आरोपांखाली अटक झाले आहेत. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. याआधी सोमनाथ भारती यांच्यावरही घरगुती हिंसाचाराचे आरोप होते. मनीष सिसोदिया हे अटक झालेले आपचे पाचवे मंत्री होते.

Kapil Sibal News
Pune-Mumbai highway Accident News : बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

दिल्लीतल्या मद्य धोरणात दिल्ली सरकारने २०२०-२१ मध्ये बदल केला होता. काही ठराविक कंत्राटदारांनाच त्यात फायदा मिळवून दिल्याचा आरोप आहे. संबंधित योग्य त्या विभागाच्या संमती न घेताच लायसन्स फीमध्ये सवलत दिल्याचाही आरोप आहे.

हा निर्णय पक्षपातीपणे घेतल्याचा आरोप केजरीवाल यांच्यावर आहे. या मद्य विक्री धोरणातील घोटाळ्याचा आरोप करत मनिष सिसोदियांना अटक करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com