Literate State: विश्वास बसणार नाही पण.. देशातील 'हे' राज्य बनलं संपूर्ण साक्षर राज्य; राज्यपालांनी केली घोषणा

Literate State: देशात आजवर दक्षिण भारतातील केरळ हे राज्य सर्वाधिक साक्षर राज्य म्हणून सर्वांना माहिती आहे. पण आता केरळलाही मागे टाकत उत्तर भारतातील एका राज्यानं संपूर्ण साक्षर राज्य होण्याचा मान पटकावला आहे.
Complete Literate State
Complete Literate State
Published on
Updated on

Literate State: देशात आजवर दक्षिण भारतातील केरळ हे राज्य सर्वाधिक साक्षर राज्य म्हणून सर्वांना माहिती आहे. पण आता केरळलाही मागे टाकत उत्तर भारतातील एका राज्यानं संपूर्ण साक्षर राज्य होण्याचा मान पटकावला आहे. या राज्याच्या राज्यपालांनी याची याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि नव भारत साक्षरता कार्यक्रमांच्या मानकांतर्गत ही घोषणा करण्यात आली आहे.

Complete Literate State
Building Collapsed : पिंपरी-चिंचवडमध्ये सततच्या पावसामुळं इमारत कोसळली! १४ जण अडकल्याची भीती

कोणतं राज्य आहे?

उत्तराखंड या राज्याला संपूर्ण साक्षर राज्याचा मान मिळाला आहे. या राज्याची साक्षरता ९८ टक्क्यांहून अधिक आहे. शिक्षणमंत्री डॉ. धनसिंह रावत यांनी सांगितलं की, उत्तराखंड राज्यानं भारत सरकारच्या उल्लास (अंडरस्टँडिंग लाइफलॉन्ग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी) कार्यक्रमांतर्गत निश्चित साक्षरता मानकं पूर्ण करण्यात आली आहेत. उल्लास कार्यक्रमांतर्गत राज्यात प्रौढांसाठी पायाभूत साक्षरता, जीवन कौशल्य आणि सातत्यानं शिक्षणावर विशेष ध्यान देण्यात आलं आहे. यासाठी सामाजिक संस्था, कॉर्पोरेट शाखा आणि जागरुक नागरिकांच्या सहकार्यानं गावांना दत्तक घेण्यात आलं आहे.

Complete Literate State
Dowry Demand: पतीच्या दबावाखाली पत्नीनं माहेरच्या संपत्तीत वाटा मागणं आता हुंडा ठरणार? हायकोर्टाचं महत्वाचं निरिक्षण

तसंच निरक्षर प्रौढांना साक्षर बनवण्यात आलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं महिला, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती आणि अन्य वंचित समुहांचा सहभाग होता. तसंच यामध्ये त्या क्षेत्रांना प्राथमिकता दिली गेली जिथं महिला साक्षरतेचा दर हा ६० टक्क्यांहून कमी होता. शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की, आजवर पाच राज्यांना मिझोराम, गोवा, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांनही ही कामगिरी केली आहे.

असा निश्चित केला जातो पूर्ण साक्षर राज्याचा दर्जा

केंद्र सरकारच्या उल्लास कार्यक्रमांतर्गत पूर्ण साक्षर राज्याचा दर्जा निश्चित करण्यात आला आहे. हा १५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांच्या शिक्षणावर केंद्रीत होत. सरकारच्या माहितीनुसार, जेव्हा कोणत्याही राज्यात प्रौढांचा साक्षरतेचा दर हा सुमारे ९५ टक्के किंवा त्याहून अधिक होतो. त्याचबरोबर निरक्षर लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं लक्ष्य पूर्ण होत, तेव्हा त्याला पूर्ण साक्षर राज्य मानलं जातं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com