

Building Collapsed : पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं आत्तापर्यंत अनेक झाडपडीच्या घटना घडून अनेकांचं नुकसान झालं आहे. त्यातच आता याच सततच्या पावसामुळं पिंपरी-चिंचवडमध्ये एक रहिवासी इमारत कोसळल्याचं वृत्त आहे. याखाली १४ रहिवासी अडकून पडल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले आहेत.
सामटीव्हीच्या वृत्तानुसार, गेल्या चार-पाच दिवसांपासून पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळंच ही इमारत कोसळली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोशीच्या कचरा डेपोजवळ ही दुर्घटना घडली आहे. या इमारतीखाली १४ जण दबले गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाचवकार्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळाकडं रवाना झालं आहे.
काही वर्षांपूर्वीच ही इमारत बांधण्यात आली आहे, त्यामुळं या इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दोन मजली ही इमारत असून दीड तासापूर्वी ही दुर्घटना घडली आहे. या भागात बऱ्यापैकी मोकळी जागा आहे, इथं बाजुलाच कचरा डेपो आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.