Chirag Paswan : राजकीय फेरा, चिराग पासवान यांच्या काकांना 40 वर्षे जुनं घर कराव लागलं खाली

Pashupati Paras evicted from Patna House : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आपले काका पशुपती पारस यांनी अनधिकृतपणे राहत असलेले घर खाली करून घेतले आहे.
Chirag Paswan | Pashupati Paras
Chirag Paswan | Pashupati ParasSarkarnama
Published on
Updated on

Bihar News : राजकीय द्वंद किती टोकाला जाऊ शकतो, हे महाराष्ट्रातील राजकारणात दिसते. राजकारणातील हे द्वंद फक्त काही महाराष्ट्रातच नाही.

जगाच्या पाठिवर कुठेही गेले, तरी राजकारणामुळे घर फुटतं हा सर्वश्रुत आहे. असेच काहीसे बिहारच्या राजकारणात अनुभवायला येत आहे.

लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री (Union Minister) चिराग पासवान यांचे आपले काका पशुपती यांच्यातील वाद संपूर्ण राजकीय वर्तुळात प्रसिद्ध आहे. बिहारमध्ये या घरण्यातील वादाचे अनेक किस्से रंगून सांगितले जातात. पशुपती यांनी केलेल्या कुरघोड्यांना चिराग पासवान यांनी आता त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. चिराग पासवान यांनी काका पशुपती यांना त्यांचे 40 वर्षे जुने घर सोडायला लावले आहे.

Chirag Paswan | Pashupati Paras
BJP On Rahul Gandhi : भाजपने घेतला राहुल गांधींचा धसका; निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

बिहारच्या पाटणा विमानतळाजवळ असलेले हे घर चिराग यांचे वडील रामविलास पासवान यांनी लोक जनशक्ती पार्टी (LJP) कार्यालय म्हणून नोंदणीकृत केले होते. पंरतु यात अनधिकृतपणे चिराग यांचे काका पशुपती पारस आपल्या कुटुंबासह राहत होते. यावरून चिराग आणि पशुपती यांच्यात वाद वाढला होता. आता हे घर चिराग यांनी खाली करून घेतलं आहे. पशुपती कुटुंबासमवेत आमदार कॉलनीतील त्यांच्या घरी स्थलांतरित झालेत. बिहार (Bihar) सरकारच्या इमारत बांधकाम विभागाने पशुपती पारस यांना कार्यालय रिकामे करण्यास सांगितले होते. त्यांना 13 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतीपूर्वीच त्यांना बाहेर काढण्यात आले.

Chirag Paswan | Pashupati Paras
Rahul Gandhi : …Love बोलायचे विसरून गेलो होतो! राहुल गांधींकडून 'तो' टी-शर्ट घालून प्रचार

या घरातून बाहेर काढू नये यासाठी माजी केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांकडे 'फिल्डिंग' लावली होती. घर आणि कार्यालय वाचवण्यासाठी आवाहन केले होते. परंतु चिराग यांच्या जिद्दीसमोर भाजपच्या कोणत्याही नेत्याचे काही चालले नाही.

लोक जनशक्ती पक्षात फूट पडल्यानंतर चिराग पासवान यांना एकदा अपमानित व्हावे लागले होते. दोन वर्षांपूर्वी वडिलांचे कायमचे घर बनलेल्या दिल्लीतील बंगल्यातून त्यांना हाकलून देण्यात आले. रामविलास पासवान हे सोनिया गांधींचे शेजारी होते आणि त्यांचे 12 जनपथ रोडवरील निवासस्थान, 10 जनपथच्या शेजारी, दिल्लीच्या सर्वात प्रसिद्ध पत्त्यांपैकी एक होते. पण मार्च 2022 मध्ये चिराग पासवान यांची हकालपट्टी करण्यात आली.

यावेळी घराबाहेरील रस्त्यावर पडलेले सामानाची छायाचित्रे देखील व्हायरल झाले होते. यात रामविलास पासवान यांचेही फोटो होते. यानंतर चिराग पासवान म्हणाले होते, 'त्यांनी माझ्या वडिलांचा फोटो फेकला. आमच्याकडे अशी सुंदर चित्रे होती. चित्रांवर चप्पल घालून तो निघून गेला. बेडवरही त्यांनी चप्पल घातलेली होती'.

रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पक्षात फूट पडली. पशुपती पारस केंद्रात मंत्री झाले होते. आता परिस्थिती उलटी आहे. चिराग पासवान हे मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत. लोक जनशक्ती पक्षाचा लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर चिराग पासवान यांचे राजकीय स्टार उंचीवर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com