Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींची मित्रपक्षाने केली कोंडी; चंद्राबाबूंनी टाकला आरक्षणाचा डाव

Chandrababu Naidu News : नायडूंनी मुस्लिमांना आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुस्लिम आरक्षणावरून पंतप्रधान मोदींकडून सातत्याने काँग्रेसवर टीका केली जात आहे.
PM Narendra Modi, Chandrababu Naidu
PM Narendra Modi, Chandrababu NaiduSarkarnama

Andhra Pradesh News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुस्लिमांना आरक्षणावरून काँग्रेसवर निशाणा साधला जात आहे. कर्नाटकात ओबीसीतून मुस्लिमांना दिलेल्या आरक्षणावरून मोदी टीका करत आहेत. संविधानानुसार धर्मावर आधारित आरक्षण देता येत नाही, असे मोदी सातत्याने सांगत आहेत. मात्र, आता मोदींच्या मित्रपक्षाने त्यांची कोंडी केली आहे.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी रविवारी मुस्लिमांना चार टक्के आरक्षण (Reservation) देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी सुरूवातीपासूनच मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याच्या बाजूने आहे आणि पुढेही ही भूमिका कायम असेल, असे नायडूंनी स्पष्ट केले आहे. (Latest Political News)

PM Narendra Modi, Chandrababu Naidu
Akhilesh Yadav News : जनता के सच्चे सवाल! अखिलेश यांनी भाजपला विचारले 109 प्रश्न...

टीडीपीने (TDP) लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत (BJP) आघाडी केली आहे. त्यामुळे त्यांच्या मुस्लिम आरक्षणाच्या भूमिकेमुळे भाजपसह मोदींची कोंडी होणार आहे. मोदींकडून (PM Narendra Modi) सातत्याने धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. त्याविरोधात नायडूंनी आपले मत मांडल्याने एनडीएमध्ये आरक्षणावरून सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.   

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील आठवड्यात नायडूंनी मक्का यात्रेकरूंसाठी एक लाख रुपये आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यात एनडीएची सत्ता आल्यानंतर प्रत्येक मुस्लिम यात्रेकरूला एक लाख रुपयांची मदत देली जईल, असे नायडू म्हणाले होते.

दरम्यान, नायडू यांच्या मुस्लिम आरक्षणाच्या नाऱ्यामुळे काँग्रेसच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. नायडू यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसकडून भाजपसह मोदींवर निशाणा साधला जाऊ शकतो. मोदींकडून ओबीसीतून मुस्लिमांना आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावरूनही काँग्रेसकडून यापुर्वीच पलटवार करण्यात आला आहे. 

काँग्रेसने एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण दिल्याचे विधान मोदी प्रचारसभेत करत आहेत. त्यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी दोन वर्षांपुर्वीचा मोदींचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये गुजरातमध्ये मुस्लिमांमधील 70 जातींना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळत असल्याचे मोदी म्हणताना दिसत आहेत. आता नायडूंच्या विधानावर भाजप काय उत्तर देणार, याकडेही लक्ष लागले आहे.

PM Narendra Modi, Chandrababu Naidu
OBC Reservation News : गुजरातमध्येही मुस्लिमांना आरक्षण; मोदींचा दोन वर्षांपुर्वीचा व्हिडिओ व्हायरल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com