BJP Lok Sabha Candidate First List : 'मिशन 45'चा दावा, पण भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्राला स्थानच नाही

Lok Sabha Election 2024 : भाजपच्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय मंत्र्यांसह 28 महिलांना स्थान देण्यात आले आहे. या यादीत उमेदवारांचे सोशल इंजिनिअरिंग साधल्याचेही दिसून येत आहे.
Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin GadkariSarkarnama

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने आघाडी घेत पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने 16 राज्यांतील 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान, भाजपने 'अब की बार चारसौ पार' नारा दिला आहे. हे ध्येय गाठण्यासाठी भाजप महाराष्ट्रात 'मिशन 45' राबवणार आहे. असे असले तरी भाजपने पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराला स्थान दिलेले नाही. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नाव वगळल्याने राज्यात उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे राज्यातील उमेदवारांबाबत उत्सुकता शिगेला पोहाेचलेली आहे. BJP Lok Sabha Candidate First List

भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा केली. यात भाजपच्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय मंत्र्यांसह 28 महिलांना स्थान देण्यात आले आहे. या यादीत उमेदवारांचे सोशल इंजिनिअरिंग साधल्याचेही दिसून येत आहे. जातीच्या योग्य समीकरणामुळे तावडेंनी भाजप सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदी वाराणसीमधून निवडणूक लढवणार; भाजपाची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) वाराणसी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) गांधीनगर, मध्य प्रदेशातील गुनामधून ज्योतिरादित्य शिंदे, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान विदिशा, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला कोटा, श्रीपाद नाईक उत्तर गोव्यातून, बासुरी स्वराज दक्षिण दिल्ली, हेमामालिनी मथुरा अशा काही प्रमुख नेत्यांच्या उमेदवारीवर पहिल्या यादीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. असे असले तरी पहिल्या यादीतून महाराष्ट्राला वगळल्याने चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. ज्याचा सीटिंग खासदार त्या पक्षाची जागा, असा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जाते. या सूत्रानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला चार जागा येण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जास्त जागांवर दावा ठोकला आहे. परिणामी जागावाटपात महायुतीतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी पक्षांत अद्याप एकवाक्यता झाल्याचे दिसून येत नाही. भाजपच्या आगामी यादीत महाराष्ट्रातील कुणाकुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
Anil Desai News : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनिल देसाईंना बजावले समन्स; 'हे' आहे कारण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com