BJP and Loksabha Election 2024 News : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच देशभरातील 16 राज्यांतील 195 उमेदवारांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी वाचून दाखवली.
यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच गृहमंत्री अमित शाह हे गुजरातमधील गांधीनगर येथून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. पहिल्या यादीत भाजपने(BJP) 34 केंद्रीय मंत्र्यांना, 28 महिलांना स्थान देण्यात आले आहे. या वेळी तावडे यांनी भाजप सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) वाराणसी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गांधीनगर, मध्य प्रदेशातील गुनामधून ज्योतिरादित्य शिंदे, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान-विदिशा, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला-कोटा, श्रीपाद नाईक उत्तर गोव्यातून अशा काही प्रमुख नेत्यांच्या उमेदवारीवर पहिल्या यादीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
या उमेदवारांपैकी 28 महिला आहेत. 47 उमेदवार 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. यादीत 27 अनुसूचित जाती आणि 18 एसटी उमेदवार आणि 57 ओबीसी उमेदवार उभे करण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 20, मध्य प्रदेशातील 24, गुजरात आणि राजस्थानमधील प्रत्येकी 15, केरळमधील 12, तेलंगणातील 9, आसाममधील 11, झारखंड आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी 11 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. दिल्लीतून 5, जम्मू-काश्मीरमधून 2, उत्तराखंडमधून 3, अरुणाचल प्रदेशमधून 2 आणि गोवा, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार आणि दमण तसेच दीवमधून प्रत्येकी 1 एक उमेदवारांचा भाजपच्या पहिल्या यादीत समावेश आहे.
(Edited by - Mayur Ratnaaprkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.