Lok Sabha Election 2024 : नूपुर शर्मा रायबरेली जिंकून देणार? वरुण गांधींच्या जागी राहुल गांधींच्या मित्राची चर्चा

Nupur Sharma News : नूपुर शर्मा या भाजपच्या दिल्लीतील नेत्या असून, पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते.
Jitin Prasad, Nupur Sharma
Jitin Prasad, Nupur SharmaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : भाजपने लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) 400 हून अधिक जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात तोलामोलाचा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उत्तर प्रदेश हे भाजपचे महत्त्वाचे राज्य आहे. येथील सर्व 80 जागा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. अमेठीत राहुल गांधींचा पराभव केल्यानंतर आता भाजपने रायबरेलीतही गांधींचा पराभव करण्यासाठी वादग्रस्त महिला नेत्याला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा आहे.

देशात दोन वर्षांपूर्वी नूपुर शर्मा (Nupur Shrama) हे नाव अचानक प्रकाशझोतात आले होते. 2022 मध्ये एका टीव्ही शोमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. जगातील तसेच मुस्लिम देशातील नेत्यांनीही त्याचा निषेध केला. त्यामुळे भाजपने (BJP) शर्मा यांना निलंबित केले होते. भाजपमध्ये अनेक नेते, कार्यकर्त्यांनी शर्मा यांचे त्यावेळी समर्थनही केले होते.

Jitin Prasad, Nupur Sharma
Nitin Gadkari News : शाहांच्या भेटीआधी राज ठाकरेंचा आज सकाळीच गडकरींना फोन

आगामी लोकसभा निवडणुकीत याच नूपुर शर्मा यांना गांधींचा गड समजल्या जाणाऱ्या रायबरेलीतून (Raibareli) भाजपकडून तिकीट दिले जाण्याची चर्चा आहे. यूपीत मागील निवडणुकीत काँग्रेसला (Congress) केवळ रायबरेलीत विजय मिळाला होता. तिथून पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) विजयी झाल्या होत्या. आता त्या राज्यसभेवर गेल्याने प्रियांका गांधींना (Priyanka Gandhi) उमेदवारी मिळू शकते. त्यांच्याविरोधात भाजप नूपुर यांना मैदानात उतरवू शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वरुण गांधींचा पत्ता कट होणार?

पिलिभित लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार वरुण गांधी यांचा पत्ता कट होऊ शकतो. त्यांच्या जागी राहुल गांधींचे जुने मित्र जीतिन प्रसाद यांना उमेदवारी जाहीर होऊ शकते, अशी चर्चा आहे. जीतिन प्रसाद हे यापूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झाले आहेत. सध्या ते राज्यात मंत्री आहेत. त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले जाऊ शकते.

वरुण गांधी यांनी मागील पाच वर्षांत अनेक मोदी सरकार तसेच योगी सरकारवरही उघडपणे निशाणा साधला होता. दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनासह केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाच्या गाडीखाली चिरडले गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली होती. त्यामुळे त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळणार नाही, अशी चर्चा आहे.  

R

Jitin Prasad, Nupur Sharma
Sita Soren News : झारखंडमध्ये राजकीय भूकंप; सोरेन यांच्या सूनबाईंची पक्षाला सोडचिठ्ठी, आमदारकीही सोडली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com