Uttar Pradesh Lok Sabha : हमें तो अपनों ने लूटा, गैरो में..! म्हणून यूपीत भाजपचा पराभव, 12 जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

BJP Task Force Lok Sabha Election 2024 Samajwadi Party : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसला असून केवळ 33 जागांवर समाधान मानावे लागले.
PM Narendra Modi, Yogi Adityanath
PM Narendra Modi, Yogi AdityanathSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला अनपेक्षितपणे मोठा धक्का बसला. मागील निवडणुकीत भाजपला 62 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत हा आकडा जवळपास निम्म्याने खाली आला. या पराभवाची कारणे शोधताना भाजपच्या टास्क फोर्सने दोन मुद्यांवर सर्वाधिक जोर दिला आहे.

भाजपने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सने आपला अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सादर केल्याचे समजते. त्यामध्ये भाजपमधील अंतर्गत कलह आणि जिल्हा प्रशासनाचा असहकार या कारणांमुळे भाजपला मोठा फटका बसल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.    

PM Narendra Modi, Yogi Adityanath
Narendra Modi : विरोधकांनी लोकसभेत केलेली मागणी मोदींनी राज्यसभेत पूर्ण केली!

अहवाल प्राप्त झाल्यानंतर योगी सरकारकडून लगेच जवळपास बारा जिल्ह्याधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भाजपला समाधानकारक मते न मिळालेल्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. टास्क फोर्सने पक्षातील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवताना ‘हमें तो अपनों ने लुटा, गैंरो में कहाँ दम था...’ असे म्हटले आहे.

त्याचप्रमाणे तिकीट वाटपात झालेला गोंधळ, विरोधकांनी संविधानाबाबत निर्माण केलेली भीती आणि मायावती यांच्या पक्षाची मते समाजवादी पक्षाकडे वळाल्याने इंडिया आघाडीला यश मिळाल्याचेही अहवालात म्हटले आहे. प्रामुख्याने दलित आणि मुस्लिम मते भाजपच्या पारड्यात पडली नाहीत.

PM Narendra Modi, Yogi Adityanath
Narendra Modi : विरोधकांनी लोकसभेत केलेली मागणी मोदींनी राज्यसभेत पूर्ण केली!

भाजपचे राज्यसभेचे खासदार पुरुषोत्तम रुपाला यांनी ठाकूर समाजाविषयी (राजपूत) केलेल्या विधानाचा फटका अनेक भागांत बसला. या विधानामुळे रुपाला हे राजकोटमध्ये विजयी झाले असले तरी यूपीतील पुर्वांचलमधील भाजप उमेदवारांना दणका बसला. या भागात 27 पैकी केवळ 11 (-9) जागा भाजपला मिळाल्या.

उत्तर प्रदेशातील भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांच्यासह इतर काही नेत्यांनी उघडपणे संविधान बदलाची भाषा केली होती. हाच मुद्दा निवडणुकीत विरोधकांनी उचलून धरला आणि संपूर्ण प्रचारात रान उठवले. त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे भाजपचे नेतेही मान्य करत आहेत. टास्क फोर्सनेही पराभवामागे हे कारण दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com