Uttar Pradesh News : बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांना निवडणूक आयोगाकडून जबरदस्त दणका बसला आहे. उत्तर प्रदेशातील बरेली लोकसभा मतदारसंघातून बसपाचे उमेदवार छोटेलाल गंगवार यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. त्यांच्या अर्जात त्रुटी राहिल्याचे कारण देत उमेदवारी अर्जच बाद करण्यात आला. तर दुसरीकडे आमला या मतदारसंघातून बसपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार सत्यवीर यांचा अर्जही फेटाळण्यात आला. (Latest Marathi News)
आज सकाळपर्यंत सत्यवीर स्वत:ला बसपाचे उमेदवार असल्याचा दावा करत होते. मात्र बसपाकडून आबिद अली यांना आमलामध्ये आपला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. बसपाचे बनावट पत्र वापरुन सत्यवीर यांच्याकडून आपल्या उमेदवारीबाबत दावा करत होते. बसपा (BSP) प्रमुखांनी शनिवारी आबिद अली यांना पक्षाची उमेदवारी दिल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमला लोकसभेच्या (Lok Sabha) जागेवर बसपाच्या उमेदवारावरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. बसपाच्या चिन्हावर पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरणाऱ्या आबिद अली यांना बसप प्रमुखांनी आपला अधिकृत उमेदवार बनवले आहे. तर सत्यवीर सिंग यांना मोठा धक्का बसला आहे. रिटर्निंग ऑफिसरने छाननीदरम्यान सत्यवीर यांचे उमेदवारी अर्ज फेटाळले. सत्यवीर हे स्वत:ला बसपा उमेदवार असल्याचे म्हणत होते, पण बसप प्रमुखांनी आबिद अली यांना उमेदवार म्हणून घोषित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.