New Delhi News : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहचला असून विविध पक्षांतील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले जात आहेत. त्यातच आता निवडणूक आयोगाने दोन्ही नेत्यांच्या काही भाषणांवरून भाजप आणि काँग्रेस आचारसंहिता भंगाची नोटीस बजावली आहे.
निवडणूक आयोगाकडे (Election Commission) दररोज अनेक आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल होत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भाजप (BJP) आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांचा समावेश आहे. नेत्यांची भाषणे, वादग्रस्त विधानं तसेच इतर प्रशासकीय यंत्रणांमधील त्रुटी, सभांबाबत आक्षेप नोंदवले जात आहेत.
काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भाषणाबाबत आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजपनेही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात आचारसंहित भंगाची तक्रार केली आहे. प्रचारसभांमधून धार्मिक, जातीच्या आधारावर समाजामध्ये तेढ निर्माण केली जात असल्याचा आरोप तक्रारींमध्ये करण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निवडणूक आयोगाने या तक्रारींची दखल घेत भाजप व काँग्रेसला नोटीस पाठवली आहे. या तक्रारींवर त्यांच्याकडून 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर मागवण्यात आले आहे. या उत्तरांनंतर निवडणूक आयोग दोन्ही नेत्यांवर कोणती कारवाई करायची, याबाबत निर्णय घेईल.
लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील कलम 77 नुसार आयोगाने ही नोटीस बजावली असून त्यानुसार पक्षाच्या अध्यक्षांना जबाबदार धरले आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार, विशेषत: स्टार प्रचारकांच्या वागणुकीची प्राथमिक जबाबदारी घ्यायला हवी. उच्च पदांवरील लोकांच्या प्रचारसभेतील भाषणांचे अधिक गंभीर परिणाम होतात, असे आयोगाने म्हटले आहे.
मोदींनी क्लीन चिट
पीलीभीतमध्ये मोदींनी केलेल्या प्रचारसभेतील भाषणाबाबत एका वकिलांनी आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावर निकाल देताना आयोगाने मोदींना क्लीन चिट दिली आहे. राम मंदिरांच्या उभारणीचा मुद्याचा उल्लेख करणे म्हणजे धर्माच्या नावावर मते मागणे असा होत नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मोदींनी राजस्थानमधील एका सभेत काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत मुस्लिम समुदायाविषयी विधान केले होते. त्यावरून सध्या भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आहे. काँग्रेस लोकांची संपत्ती लुटून घुसखोर आणि जास्त मुले असलेल्यांना वाटणार असल्याचे विधान मोदींनी केले होती. काँग्रेसने आयोगाकडे याबाबत तक्रार केली असून आयोगाकडूनही त्याची पडताळणी केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.