New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर भाजपला धक्का बसला आहे. भाजपामधील दिग्गज नेते, माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह चौधरी यांचे पुत्र आणि हिसार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांनी काँग्रेसमध्य प्रवेश केला आहे. राजकीय कारणास्तव भाजप सोडल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या उपस्थितीत सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपचा (BJP) राजीनामा देताना सिंह यांनी म्हटले आहे की, राजकीय कारणास्तव भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी भाजपाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अमित शाह यांचे आभार मानतो. त्यांनी मला हिसारमध्ये काम करण्याची संधी दिली.
हरियाणामध्ये लोकसभेच्या दहा जागा आहे. 2019 मध्ये भाजपने सर्व दहा जागांवर विजय मिळवला होता. हिसार मतदारसंघातून ब्रिजेंद्र सिंह (Brijendra Singh) यानी 3 लाख 14 हजार मतांनी निवडणूक जिंकली होती. त्यांनी जेजेपी पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला आणि काँग्रेसचे भव्य बिश्नोई यांचा पराभव केला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ब्रिजेंद्र सिंह हे माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह (Birendra Singh) यांचे पुत्र आहेत. राजकारणात येण्यापुर्वी ब्रिजेंद्र सिंह हे शासकीय सेवेत होते. ते आयएएस होते. पदाचा राजीनामा देऊन ते भाजपमध्ये दाखल होत निवडणूक लढवली होती. त्यांना 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
ब्रिजेंद्र सिंह यांचे वडील बिरेंद्र सिंह हे 2022 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. तसेच 1977, 1982, 1994, 1996 आणि 2005 मध्ये ते उचाना मतदारसंघाचे आमदार होते. तीनवेळा राज्य सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी २०१४ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014 ते 2019 मध्ये ते केंद्रीय मंत्री होते. तेही लवकरच काँग्रेसमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.