Shirur Constituency : 'मी गायब झालो नाही आणि होणारही नाही, प्रतीक्षा आहे..' ; आढळरावांनी लगावला कोल्हेंना टोला!

Shivajirao Adhlarao Patil on Amol Kolhe : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान सुरू असून, 4 जून रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.
Shivajirao Adhlarao Patil on Amol Kolhe
Shivajirao Adhlarao Patil on Amol KolheSarkarnama

Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम म्हणजे सातव्या टप्प्याचे मतदान आज पार पडत आहे. तर महाराष्ट्रातील मतदान हे पाचव्या टप्प्यात संपले असून, आता राज्यातील सर्व उमेदवारांसह जनतेला निकालाची प्रतीक्षा आहे. या निकाल लागेपर्यंत काही विद्यमान उमेदवार हे मतदारसंघाबाहेर गेलेले आहेत, तर काहीजण अद्याप मतदारसंघातच दिसत आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना टोला लगावला आहे.

आढळराव म्हणाले, 'लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मी शिरुर लोकसभा मतदार संघात ठाण मांडून बसलेलो आहे. निवडणुकीच्या निकालाआधी मी दोन रविवार जनता दरबार घेतले. जुन्नर-आंबेगावसह चार तालुक्यांतील बिबट्यांच्या प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत(Ajit Pawar) बैठक घेवून ठोस निर्णय घेतले. अर्थात या बैठकीला मी विद्यमान खासदार डॉ.कोल्हेंसह सर्वपक्षीय नेते-पदाधिका-यांना बोलावून निर्णायक बैठक घेतली. मात्र कुणीतरी पुन्हा एकदा गायब झाले आणि आम्ही मात्र मतदार संघातील प्रश्नांसोबत कायम राहिलो.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच 'मी एवढेच सांगतो की, मी गेली 22 वर्षे जनसेवेचा ध्यास घेतलेला आहे आणि तो माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम असेन. एक मात्र नक्की की, हीच जनसेवेच्या निकालाची प्रतीक्षा मला विजयी करेल एवढा विश्वास मला आहे.' असे म्हणत शिवाजीराव आढळराव((Shivajirao Adhlarao Patil)) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.'

Shivajirao Adhlarao Patil on Amol Kolhe
Amol Kolhe vs. Shivajirao Adhlrao Patil : शिरूरच्या 'किल्ल्या'साठी कोल्हे-आढळराव पाच वाजेपर्यंत झुंजणार !

देशातील लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा आज संपत असताना प्रत्येकाला 4 जूनची प्रतीक्षा आहे. या दिवशी देशाचे भविष्य ठरणार असून अनेक लक्षवेधी लढतींचे चित्रही स्पष्ट होणार आहे. याच पार्श्वभूमिवर शिरुरमधून पाचव्यांदा लोकसभेत जाण्यासाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांची निकालाबद्दल काय प्रतिक्रिया आहे, याबद्दल जाणून घेतले असता त्यांनी वरील प्रमाणे विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याबद्द्ल थेटपणे बोलणे टाळून त्यांच्या मतदार संघातील अनुपस्थितीबद्दल पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित केले व आपण शिरुरमधून विजयी होवू असा दावा केला आहे.

याच पार्श्वभूमीवर त्यांनी पुढे सांगितले की, मी मागील (सन 2019 ) निवडणूक लढवून हरलो तरी मतदार संघातील कनेक्ट कमी होवू दिला नाही. पुढील काळात प्रत्येक रविवारी जनता दरबार कायम सुरू ठेवला. कोरोना काळात तर सगळे गायब असताना मी मात्र मतदार संघातील प्रत्येक गावात जावून वैद्यकीय मदतीसह आर्थिक, वस्तुरुप आणि इतर शासकीय मदतीसाठी सदैवर तत्पर राहिलो. अर्थात माझ्या उपस्थितीमुळे शिरुरमधील एकाही गावाला असे कधी वाटले नाही की, आपले विद्यमान खासदार गायब आहेत. कारण ही सगळी मोकळी स्पेस मी भरुन काढत आलो.

याशिवाय निवडणुकीनंतर बिबट्यांच्या हल्ल्याचा प्रश्न गंभीर असल्याने मी जुन्नर, आंबेगाव, शिरुर व खेड तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिका-यांना घेवून हा प्रश्न घेवून उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत मुंबईत बैठक घेतली. त्यात वरील चार तालुक्यांमध्ये दिवसभर थ्रीफेज लाईट चालू राहील याचा निर्णय केला. या शिवाय माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राची क्षमता 40 वरुन 100 ते 200 पर्यंत करण्याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आणला असून लवकरच त्याचे टेंडरही काढले जाईल.

Shivajirao Adhlarao Patil on Amol Kolhe
Shrirang Barne Vs Sanjog Waghere: मावळाचा शिलेदार बाण उचलणारा की मशाल पेटवणारा?

वरील चारही तालुक्यांमध्ये वाढीव पिंजरेही लावण्याचा प्रश्न सोडविला. या बैठकीला या प्रश्नी उपोषणाला बसलेले माजी आमदार शरद सोनवणे, आमदार अतुल बेणके, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके आदींसह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असताना विद्यमान खासदारांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले की, साहेब बाहेर आहेत. मी त्यांना आता गायब म्हणणार नाही, पण ते नेमक्या प्रश्नावेळी गायब असतात आणि मतदार संघातूनही ते गायब राहतात याचा अनुभव घेतला एवढे मात्र नक्की.

मी लगेच कामाला लागलो आणि कुणीतरी लगेच गायब झाले....!

'मी 13 तारखेची माझी निवडणूक होताच दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा कामाला लागलो. मी दोन जनता दरबार मी माझ्या लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथील कार्यालयात घेतले आणि मोठ्या संख्येने उपस्थित नागरीकांच्या प्रश्नांसाठी मदतीसाठी उभा राहिलो. अर्थात याच माझ्या मतदार संघातील ’फिजीकल प्रेजेंन्स’ मुळेच मला सन 2024 मधील निवडणुकीचा निकाल माझ्यासारखा लागेल अशी आशा असून मला पुन्हा जोमाने मतदार संघाची पूर्ण मनोभावे सेवा करायची आहे. माझी भिस्त ही मतदार संघातील नागरीकांच्या आशिर्वादावर असून मी केलेल्या सेवेचे पोचपावती मला दि.४ रोजी मिळेल असा पूर्ण विश्वास मला वाटत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com