Lok Sabha Election 2024 : हायकोर्टाचे न्यायाधीश राजीनामा देऊन येणार राजकारणात; भाजपमध्ये करणार प्रवेश?

Abhijit Gangopadhyay News : न्यायाधीश अभिजत गंगोपाध्याय हे मंगळवारी राजीनामा देणार असून, त्यानंतर पुढील राजकीय वाटचाल ठरवणार आहेत. ते कोणत्या पक्षात जाणार, याबाबत स्पष्टता नसली तरी भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे.
Abhijit Gangopadhyay
Abhijit GangopadhyaySarkarnama
Published on
Updated on

West Bengal News : माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्त होताच राज्यसभेचे खासदार झाले. त्यांच्या या भूमिकेवर अनेकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. आता हायकोर्टाचे एक न्यायाधीश थेट राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करणार असल्याने पुन्हा चर्चा झडू लागल्या आहेत. न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय असे त्यांचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर ते राजीनामा देत असल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

न्यायाधीश गंगोपाध्याय हे सध्या कोलकाता हायकोर्टात (kolkata High Court) आहेत. त्यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा देऊन राजकारणात येणार असल्याचे जाहीर केले आहे. ते बंगालमधील (West Bengal) तामलुक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात सध्या भाजपचे (BJP) नेते सुवेंदू अधिकारी यांचे बंधू दिब्येंदू अधिकारी खासदार आहेत.

Abhijit Gangopadhyay
Chandigarh Deputy Mayor Election : अखेर भाजपला विजय मिळालाच; प्रत्यक्ष मतदानात आप-काँग्रेसला दणका...

गंगोपाध्याय (Abhijit Gangopadhyay) यांनी लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात (Political News) येणार असल्याचे एका न्यूज एजन्सीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, मी कोलकाता हायकोर्टाच्या न्यायाधीश पदाचा राजीनामा देत आहे. हा माझ्या आंतरआत्म्याचा आवाज आहे. आता मला मोठ्या क्षेत्रात आणि मोठ्या लोकांमध्ये यायचे आहे. एक न्यायाधीश केवळ कोर्टात आलेल्या प्रकरणांकडे पाहतात. पण देशात आणि राज्यात अनेक गरजू लोक आहेत. राजकारणात आलो तर त्यांची मदत करू शकेन. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निकालांमध्ये आले चर्चेत

गंगोपाध्याय यांच्या काही निकालांमध्ये ते सातत्याने चर्चेत राहिले. ते कोलकाता हायकोर्टात 2018 मध्ये आले. 2022 मध्ये त्यांनी सीबीआय (CBI) आणि ईडीला (ED) पश्चिम बंगालमध्ये कथित शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी तब्बल 32 हजार शिक्षकांना नोकरी देण्याचा निर्णय रद्द केला होता, पण पुढे हा निकालाला स्थगिती देण्यात आली होती.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात गंगोपाध्याय यांनी एका न्यूज चॅनेलला मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी शिक्षक भरती घोटाळ्यातील प्रलंबित प्रकरणांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला होता. याची दखल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घेतली. न्यायाधीशांनी अशी मुलाखत देऊ नये, असे स्पष्ट करत त्यांनी भरती घोटाळ्याची सुनावणी अन्य न्यायाधीशांकडे सोपवण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते. ममता सरकारविरोधात सातत्याने बोलत असल्याने गंगोपाध्याय हे भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे.

R

Abhijit Gangopadhyay
Bribe for Vote Case : आमदार, खासदारांना ‘सुप्रीम’ दणका; घोडेबाजार पडणार महागात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com