Lok Sabha Election 2024 : बिहारमध्ये ‘इंडिया’च्या आशेचा ‘चिराग’ विझला; भाजपचं मित्रपक्षानं ऐकलं...

Chirag Paswan News : पासवान यांनी भाजपसोबत जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याचे जाहीर केल्याने इंडिया आघाडीसोबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
JP Nadda, Chirag Paswan
JP Nadda, Chirag PaswanSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : बिहारमधील राजकीय चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने यापूर्वी आघाडीची घोषणा केली आहे, तर मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलाने काही दिवसांपूर्वीच एनडीएमध्ये दाखल हाेत इंडिया आघाडीला धक्का दिला आहे, पण लोक जनशक्ती पक्षासोबत कालपर्यंत तळ्यात-मळ्यात होते. त्याचाही आज निकाल लागला. 

'एलजेपी'चे प्रमुख चिराग पासवान (Chirag Paswan) हे भाजपसोबत सुरू असलेल्या जागावाटपावरून नाराज असल्याची जोरदार चर्चा मागील काही दिवसांत सुरू होती. काँग्रेसने (Congress) त्यांना लोकसभेच्या सात जागांची ऑफर दिल्याचेही सांगितले जात होते. चिराग काँग्रेससोबत आल्यास त्याचा एनडीएला (NDA) राज्याच्या काही भागांत फटका बसू शकतो, याची जाणीव इंडियातील पक्षांना होती. त्यामुळेच ते प्रयत्नशील होते.

JP Nadda, Chirag Paswan
Mamata Banerjee News : एका उमेदवारामुळे ममतांनी भावासोबतचं नातंच तोडलं; नेमकं काय घडलं?

भाजपने (BJP) विरोधकांच्या मनसुब्यावर आज पाणी फिरवले. चिराग पासवान यांनी आज दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एक्स हँडलवरून एनडीएतील जागावाटप निश्चित झाल्याची घोषणा केली. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. पासवान यांच्या या घोषणेमुळे इंडिया आघाडीच्या (India Alliance) आशा मावळल्या आहेत, तर एनडीएची ताकद वाढली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, भाजपने चिराग पासवान यांना पाच जागांची ऑफर दिल्याचे समजते. तसेच त्यांचे काका पशुपती पारस यांच्या पक्षानेही पाच जागा मागितल्या आहेत. या दोघांमध्ये हाजीपूर या मतदारसंघावरून अजूनही वाद सुरू असल्याची चर्चा आहे. हा मतदारसंघ चिराग पासवान यांचे वडील रामविलास पासवान यांचा बालेकिल्ला होता. काका-पुतण्याने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे.

जागावाटपाचा तिढा सुटल्याचे पासवान यांनी जाहीर केले असले तरी हाजीपूरबाबत सस्पेन्स कायम आहे. आता उमेदवारांची घोषणा झाल्यानंतरच नेमका फॉर्म्युला स्पष्ट होणार आहे. त्यामुळे एनडीएसाठी हाजीपूर मतदारसंघ महत्त्वाचा मानला जात आहे. या मतदारसंघावरून काका-पुतण्यामध्ये पुन्हा वाद झाल्यास एनडीएला फटका बसू शकतो. याची जाणीव भाजपला असल्याने सावध पावल टाकली जात असल्याचे बोलले जात आहे.

R

JP Nadda, Chirag Paswan
Electoral Bond News : 22 हजार 217 पैकी 187 रोख्यांचा पैसा पीएम फंडात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com