Mallikarjun Kharge News : पंतप्रधान मोदी 'असे' अडकलेत स्वतःच्याच जाळ्यात; खर्गेंचा दावा

Mallikarjun Kharge Vs Narendra Modi : अदानी-अबांनींविरोधात ईडी आणि प्राप्तिकर विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी राहुल गांधींनी केल्यावर पंतप्रधान मोदी...; अशी टीका खर्गेंनी केली आहे.
Mallikarjun Kharge | narendra modi
Mallikarjun Kharge | narendra modi sarkarnama

Kharge VS Modi News : लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. महाविकास आघाडी ( Mahavikas Aghdi ) आणि महायुतीमध्ये ( Mahayuti ) घमासान सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी काँग्रेस ( Congress ) आणि राहुल गांधींना लक्ष्य केले होते. अंबानी-अदानींकडून निवडणुकीसाठी पैसे घेतल्याचा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला होता. पण, मोदींचा हा आरोप म्हणजे, ते स्वतःच्याच जाळ्यात अडकले आहे, असा टोला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गें यांनी केला.

लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2204 ) अंतिम टप्प्यात आहे. पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी (ता. 20) मतदान होत आहे. भाजपने निवडणुकीसाठी पूर्ण ताकद लावली आहे. यात भाजपची दमछाक होताना दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निवडणुकीत काँग्रेस आणि राहुल गांधींना चांगलेच लक्ष्य केले होते. त्याखोलाखाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पंतप्रधान मोदींनी हिंदुत्वावरून टार्गेट केले आहे. त्यामुळे निवडणुकीत राजकीय घमासान पाहायला मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस आणि राहुल गांधींनी निवडणुकीसाठी अंबानी-अदानींकडून काळा पैसा घेतला. टेम्पो भरून पैसे घेतले, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) यावर आक्रमक पवित्रा घेतला. अंबानी-अदानींकडे काळा पैसा असल्याची माहिती पंतप्रधानांना आहे. त्यांनी त्यांच्या तपासयंत्रणांकडून कारवाई करावी, असे आव्हान राहुल गांधींनी दिले होते.

यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी ( Mallikarjun Kharge ) आपली प्रतिक्रिया दिली आहे. "अदानी-अंबानींचे नाव घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्याच जाळ्यात अडकले आहे. आपल्या मित्रांकडे काळा पैसा असल्याचा पुरावा दिला आहे. ट्रक-टेम्पो भरून पैसे दिले, तर तुम्ही काय झोपा काढत होता काय?" असा टोला देखील मल्लिकार्जुन खर्गेंनी लगावला आहे.

Mallikarjun Kharge | narendra modi
Narendra Modi & Raj Thackeray Sabha : राज ठाकरेंच्या मागण्यांवर मोदींनी अवाक्षरही काढले नाही, नेमकं सभेत घडलं काय?

"ते फक्त बोलतात, कारवाई करत नाही. त्यांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरू आहे. अदानी-अंबानींविरोधात ईडी आणि प्राप्तिकर विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी राहुल गांधींनी केल्यावर पंतप्रधान मोदी मूग गिळून गप्प बसले. ते फक्त त्यांच्या श्रीमंत मित्रांना पाठिशी घालत आहेत," असा आरोप देखील मल्लिकार्जुन खर्गेंनी केला.

Mallikarjun Kharge | narendra modi
Narendra Modi News : 'शिवतीर्थ'वरील सभेआधीच मोदींचा 'मास्टर स्ट्रोक'; विरोधकांच्या प्रचाराचा 'तो' मुद्दाच गुंडाळला?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com