Narendra Modi & Raj Thackeray Sabha : राज ठाकरेंच्या मागण्यांवर मोदींनी अवाक्षरही काढले नाही, नेमकं सभेत घडलं काय?

Lok Sabha Elections 2024 : राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर तडाखेबंद भाषण केलं. या भाषणात त्यांनी राम मंदिर होण्यापासून तिहेरी तलाक, 370 कलम हटवणे या सारख्या मोदींनी घेतलेल्या निर्णयांचे तोंडभरून कौतुक केले.
Narendra Modi  Raj Thackeray
Narendra Modi Raj Thackeray sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Elections 2024 : पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची जाहीर सभा शिवाजी पार्क मैदानावर शुक्रवारी (ता.17) झाली. तब्बल 21 वर्षांनंतर नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे सभेच्या व्यासपीठावर एकत्र आले. लोकसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे मुंबईतील हक्काचे मराठी मतदार भाजप फोडणार याची चर्चा झाली. राज ठाकरेंना महायुतीने पायघड्या घातल्या. पण, शिवाजी पार्कवरील सभेत जे घडले त्यामुळे मनसे सैनिकांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा आहेत.

Narendra Modi  Raj Thackeray
Uddhav Thackeray News : नरेंद्र मोदी शब्दांचे पक्के, पण...; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर Narendra Modi तडाखेबंद भाषण केलं. या भाषणात त्यांनी राम मंदिर होण्यापासून तिहेरी तलाक, 370 कलम हटवणे या सारख्या मोदींनी घेतलेल्या निर्णयांचे तोंडभरून कौतुक केले. आपल्या भाषणाच्या शेवटी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, मराठा सम्राज्याचा इतिहास शालेय शिक्षणात मुलांना लहानपणापासून शिकवण्यात यावा, शिवाजी महाराज यांची खरी स्मारके गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यानं ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमण्यात यावी. मुंबई-गोवा महामार्ग खड्ड्यात आहे. त्याचे काम व्हावे, असा अपेक्षा राज Raj Thackera व्यक्त केल्या.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज ठाकरे यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणासाठी आले. त्यांचे भाषण मनसे सैनिक कान देवून ऐकत होते. मोदींनी देखील तडाखेबंद भाषण करताना काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. पंतप्रधान मोदींनी आपल्या 31 मिनिटांच्या भाषणात काँग्रेसवर टीका करण्यात सात मिनिटे घालवली. उद्धव ठाकरेंवर तीन मिनिटं बोलले मात्र, राज ठाकरेंनी ज्या मागण्या केल्या, अपेक्षा व्यक्त केली त्या बद्दल अवाक्षरही काढले नाही.

अजित पवार सभेला उपस्थित

शिरुरमधील 11 मेच्या जाहीर सभेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीर सभांमध्ये दिसले नव्हते. पंतप्रधान मोदींच्या नाशिकमधील सभेत तसेच मुंबईच्या रोड शोला अजित पवार अनुपस्थित राहिल्याची चर्चा झाली. अजित पवार आजारी असल्याच्या चर्चा होत्या. त्यांच्या पक्षाकडूनच अजित पवारांना घशाचा संसर्ग झाल्याने डाॅक्टरांनी आराम करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रचारातून गायब झालेले अजित पवार शिवाजी पार्क मैदानावरील पंतप्रधान मोदींच्या सभेत दिसले. त्यांनी या सभेत भाषण देखील गेले.

Narendra Modi  Raj Thackeray
Raj Thackeray News : पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच राज ठाकरेंनी घेतलं पंडित नेहरुंचं नाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com