Lok Sabha Election : 'बसप'चा हत्ती सिंहासनावर बसणार?; मायावतींनी वाजवला बिगुल, बैठकीत मोठी घोषणा

Mayawati On Upcoming Lok Sabha Election 2024 : बसप नेत्या मायावती यांनी पक्षाची बैठक घेत मोठी घोषणा केली आहे...
Mayawati
Mayawati Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हे येत्या ३ डिसेंबरला लागणार आहेत. यापैकी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे, तर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या चार राज्यांमध्ये आधीच मतदान झाले आहे. या पाच राज्यांच्या निवडणूक निकालाची सर्वांना उत्सुकता आहे. अशातच बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी लोकसभा निवडणुकांसाठी बिगुल वाजवला आहे.

Mayawati
Sonia Gandhi : निकालापूर्वीच मुख्यमंत्री भूपेश बघेल अन् सोनिया गांधी यांच्यात सत्तेची खलबते

आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवू आणि आपल्या ताकदीच्या जोरावर सत्ता मिळवू, असे आवाहन मायावती यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले आहे. लोकसभा निवडणूक ही चुरशीची आणि रंजक असेल. या निवडणुकीत बसपाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे, असे मायावती म्हणाल्या.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मायावती यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील राजकीय स्थितीची समीक्षा उत्तर प्रदेशातील बैठकीत केली. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांनी पूर्ण शक्तीने तसेच इमानदारीने आपली जबाबदारी पार पाडावी. लोकसभा निवडणुकीत चांगेल निकाल मिळवून आपले सरकार आणू, असे आवाहन मायावतींनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमधील सरकारांची धोरणे ही जातीयवादी आणि जनताविरोधी आहेत. यामुळे राजकीय स्थिती वेगाने बदलत आहे. जनतेला कुठल्या एका पक्षाचे वचर्स्व नकोय, तर निवडणूक चौरंगी हवी, अशी जनतेची अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या.

भाजप सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, रस्ते, वीज, पाणी शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी जनता व्याकूळ आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाप्रमाणेच भाजपही आता विकासकामांच्या बळावर मत मागण्याच्या स्थितीत नाही. यामुळे प्रक्षोभक आणि समाजात फूट पाडण्याच्या मुद्द्यांचा उपयोग केला जात आहे. यामुळे बहुजन समाजाच्या नागरिकांनी सावध राहावे आणि कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका, असा आरोप मायावतींनी केला.

Mayawati
Assembly Elections of 5 States : या राज्यात जेव्हा जेव्हा महिलांनी बंपर मतदान केले आहे, तेव्हा सत्तापरिवर्तन...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com