Assembly Elections of 5 States : या राज्यात जेव्हा जेव्हा महिलांनी बंपर मतदान केले आहे, तेव्हा सत्तापरिवर्तन...

Rajasthan Assembly Elections : यंदाही "ट्रेंड" कायम राहणार ?... राजस्थानमध्ये 23 जागांवर महिलांचे बंपर मतदान
Assembly Election Survey
Assembly Election SurveySarkarnama
Published on
Updated on

Pune News : राजस्थान विधानसभा निवडणुकीत या वेळी महिलांनी मतदानात पुरुषांना मागे टाकले आहे. यामध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की, जेव्हा जेव्हा महिलांनी राजस्थानमध्ये बंपर मतदान केले आहे, तेव्हा तेव्हा सत्तापरिवर्तन झाले आहे. २००३, २०१३ आणि २०१८ मध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी जास्त होती. त्या प्रत्येकवेळी सत्ताधाऱ्यांना धक्का बसला होता. त्यामुळे यंदा मतदानानंतर राजस्थानमधील भाजपच्या नेत्यांमध्ये यशाच्या अशा द्विगुणित झाल्या आहेत.

राजस्थानमधील १९९ विधानसभा जागांसाठी ७४.६२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानाचा विचार करता हा नवा विक्रम आहे. यापूर्वी २०१८ मध्ये ७४.७१% मतदान झाले होते. त्यावेळी पुरुषांची मतदानाची टक्केवारी ७३.८० आणि महिलांची ७४.६७ होती. तोच ट्रेंड यंदाही कायम आहे. या निवडणुकीमध्ये महिलांचे ७४.७२ टक्के आणि पुरुषांचे ७४.५३ टक्के मतदान झाले आहे. तसेच राज्यांतील २३ जागांवर महिलांनी बंपर मतदान केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Assembly Election Survey
Nagar News : तक्रारी करूनही सरकारचे दुर्लक्ष; शेतकरी संघटना रस्त्यावर, गाळप बंद पाडणार...

राजस्थानच्या राजकारणात महिलांचा टक्का वाढला

राज्यातील गेल्या काही विधानसभा निवडणुकांत महिला मतदारांचा सहभाग सातत्याने वाढत आहे. २०१८ मध्ये १८९ महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी २४ म्हणजे १२.६ टक्के उमेदवार निवडून आल्या, तर पुरुषांच्या यशाची टक्केवारी ८.४४ टक्के होती. २०१३ मध्ये, महिला उमेदवारांच्या यशाची टक्केवारी १६.८६ टक्के होती. या वेळी काँग्रेसने २८ महिला उमेदवारांना, तर भाजपने २० महिला उमेदवारांना तिकीट दिले आहे. म्हणजे भाजपने केवळ १० टक्के महिलांना आणि काँग्रेसने १४ टक्के महिलांना तिकीट दिले होते.

तसेच मागील काही वर्षांतील विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास प्रत्येक हजार पुरुष मतदारांमागे महिला मतदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. हे प्रमाण १९७२ मध्ये ७२३ होते, ते १९९८ मध्ये ७८६ पर्यंत वाढले. ते २००३ मध्ये ८४१ वरून २०१३ मध्ये ८९२ आणि २०१८ मध्ये ९१४ पर्यंत वाढले आहे.

Assembly Election Survey
Chhagan Bhujbal Audio Viral : 'भुजबळसाहेब आमच्या बांधावर येऊ नका, नाहीतर वातावरण खराब...'; ऑडिओ क्लिप व्हायरल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com