Lok Sabha Election 2024 : प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेसला धक्का; माजी मंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Ramniwas Rawat News : रावत हे मागील वर्षी सहाव्यांदा आमदार झाले आहेत. काँग्रेसमधील एक बडा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पण विरोधी पक्षनेता न केल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती.
Ramniwas Rawat
Ramniwas RawatSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना मंगळवारी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आधीच एका काँग्रेस उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

त्यानंतर मध्य प्रदेशातीलच काँग्रेसचे मातब्बर नेते, माजी मंत्री रामनिवास रावत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत रावत यांनी आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. रावत यांनी विजयपूर विधानसभा मतदारसंघातून सहाव्यांदा आमदार झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूकही लढवली होती.

Ramniwas Rawat
Sex Scandal Case : कर्नाटकात मोठी घडामोड; देवेगौडांचा नातू पक्षातून निलंबित

राज्याच्या राजकारणात दबदबा असलेले रावत (Ramniwas Rawat) हे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. ते प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षही होते. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. पक्षश्रेष्ठींकडून होत असलेले दुर्लक्ष आणि विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी विचार न झाल्याने ते मागील काही महिन्यांपासून नाराज असल्याची चर्चा होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रावत यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते. मागील महिनाभरापासूनच ते भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा होती. पण लोकसभेचे तिकीट मिळण्याच्या आशेवर ते काँग्रेसमध्ये होते. काही दिवसांपूर्वी पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे.

दरम्यान, मागील दोन दिवसांत दोन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला मोठा झटका बसला आहे. इंदौर लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता मुरैना-श्योपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते रावत यांनीही पक्षाची साथ सोडली आहे.    

R

Ramniwas Rawat
Amit Shah Fake Video : शाहांच्या फेक व्हिडिओप्रकरणी जिग्नेश मेवानींचा पीए आणि आप नेत्याला अटक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com