Lok Sabha Election 2024 : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना आज अचानक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ.मोहन भागवत यांनी एका बनावट आणि खोट्या व्हिडीओच्या माध्यमातुन संघाची (RSS) होणारी बदनामी आणि आरक्षण या विषयावर विस्तृत मांडणी केली. समाजात विचार दूषित करत चुकीचे, बनावट आणि तथ्यहिन व्हिडिओवर डाॅ.मोहन भागवत यांनी प्रहार केला. त्यांनी आरक्षण या विषयावर यापुर्वी संघाची जी भूमिका होती तीच पुन्हा विषद करत या विषयावर पडदा टाकला.
देशात संघ आतमध्ये आरक्षणाला विरोध करते आणि बाहेर समर्थन करते, अशा एका खोट्या व्हिडीओची हवाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ.मोहन भागवत यांनी तेलंगणात काढली. त्यांनी तेलंगणा येथे एका शैक्षणिक संस्थेत या विषयावर भाष्य करत संघाची आरक्षणाविषयी असलेली परंपरागत आणि अधिकृत भूमिका पुन्हा एकदा देशासमोर मांडली. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तेलंगणा येथील एका शैक्षणिक संस्थेत कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख अर्थात सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरएसएस सुरुवातीपासूनच संविधानानुसार सर्व आरक्षणांना पाठिंबा देत आहे, परंतु काही लोक खोटे व्हिडिओ प्रसारित करत आहेत. असे म्हणत खोट्या व्हिडिओवर मोठा खुलासा केला. आरक्षण हे आवश्यक असेल तोपर्यंत वाढवावे, असे संघाचे मत आहे. काही गटांना दिलेल्या आरक्षणाला संघ परिवाराने कधीच विरोध केला नाही, असे डाॅ. मोहन भागवत म्हणाले. गेल्या वर्षांपुर्वी डाॅ. मोहन भागवत यांनी नागपुरात सांगितले होते की, जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे. भेदभाव जरी अदृश्य असला तरीही तो समाजात अस्तित्वात आहे.
नेमके काय म्हणाले डाॅ. मोहन भागवत
"एक व्हिडिओ फिरत आहे. संघवाले बाहेर समर्थन करतात आणि आत मध्ये आरक्षणाला विरोध दर्शवितात आणि बाहेर आम्ही बोलु शकत नाही अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे. ही अतिशय चुकीची आणि असत्य गोष्ट आहे. जेव्हा पासुन आरक्षण आले आहे तेव्हापासुन संविधानाने मान्य केलेल्या सर्व आरक्षणास संघ पुर्ण समर्थन देतो. आणि संघ असे म्हणतो की, आरक्षण ज्यांच्यासाठी आहे त्यांना जो पर्यंत आरक्षण आवश्यक वाटते त्याच बरोबर सामाजिक कारणामुळे जो पर्यंत भेदभाव आहे असे वाटते तो पर्यंत हे आरक्षण सुरु ठेवले पाहिजे. पण, मी अशी बैठक घेत असल्याचा त्यात व्हिडिओ आहे. अशा प्रकारची बैठक कधी झाली नाही. जे कधी झाले नाही असे दाखविण्याची विद्या आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान आहे. आर्टीफिशियल इंटिलिजन्स आहे. सोशल मिडिया आहे. चांगल्या गोष्टी पण जातात आणि चुकीच्या गोष्टी पण यावर जातात. तो सोशल मिडियाचा गुण नाही त्यात भाग घेणाऱ्याचा गुण आहे." असे मोहन भागवत म्हणाले.
भाजपात भागवत यांचे संविधान - आप
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या या व्हिडिओ नंतर आपचे संजय सिंग यांनी भारतात आंबेडकर यांचे संविधान मानले जाते आणि भाजपमध्ये भागवत यांचे संविधान मानले जात असल्याचा आरोप केला. भागवत यांचे संविधान देशाच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. ते संपले पाहिजे असे भागवत यांचे संविधान सांगते असा दावा आप चे संजय सिंग यांनी केला आहे. अमित शाह यांना देशात निवडणुक नको, संविधान बदलण्यासाठी भाजपाला चारशे जागा पाहिजे. संविधान बदलुन आरक्षण, निवडणुक संपविण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. देशातील केंद्रिय विश्व विद्यालयात आरक्षण संपविल्याचा दावा आपचे संजय सिंग यांनी केला.
आरक्षणावर नेमकी ओरड का ?
देशात संविधान बदलण्यात येत आहे. अशी ओरड काँग्रेस करत आहे. आरक्षणाबाबत भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर डाॅ. मोहन भागवत यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्वाचे असेच ठरणार आहे. मध्यप्रदेशातील एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला 'ओबीसी समाजाचा सर्वात मोठा शत्रू' म्हणून संबोधले आणि म्हटले की, काँग्रेसने पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये मागच्या दाराने ओबीसींसह सर्व मुस्लिम जातींचा समावेश करून धार्मिक आधारावर आरक्षण देऊ पाहत आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाला आरक्षणाच्या महत्त्वपूर्ण भागापासून वंचित ठेवण्यात आल्याचा दावा मोदींचा होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.