Chandrashekhar Bawankule News : शशिकांत शिंदेंवर गुन्हा, हा रडीचा डाव नाही! बावनकुळेंचा पवारांवर पलटवार

Lok Sabha Election 2024 : शशिकांत शिंदे यांना अटक केली जाऊ शकते, असा दावा शरद पवारांनी नुकताच एका प्रचार सभेत केला आहे. शिंदे यांच्यावर कथित शौचालय घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sharad Pawar, Chandrashekhar Bawankule
Sharad Pawar, Chandrashekhar BawankuleSarkarnama

हेमंत पवार

Satara Lok Sabha News : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. उमेदवार शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले यांच्यात होणारा हा सामना आरोप-प्रत्यारोपांनी गाजू लागला आहे. शिंदे यांच्या एका घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्हानंतर त्यांना अटक होण्याची भीती शरद पवारांनी व्यक्त केली होती. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule News) यांनीही पलटवार केला आहे.

उदयनराजे (Udayanraje Bhosle) यांच्या प्रचारासाठी साताऱ्यात आलेल्या बावनकुळे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विधानावर बोलताना ते म्हणाले, गुन्हा कोणत्या प्रकारचा आहे. त्यातून गंभीर बाबी समोर आल्या आहेत. हा तपास यंत्रणेचा भाग आहे, तो राजकीय भाग नाही. त्याचे राजकीय भांडवल कोण करत असेल तर त्याचे त्यांना लखलाभ आहे. जर चुकीचे असेल तर त्यानी पोलिसांना तपासात यंत्रणेला सांगावे. हा तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. हा रडीचा डाव नसून 51 टक्के मते घेऊन खासदार उदयनराजे भोसले विजयी होत आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Sharad Pawar, Chandrashekhar Bawankule
Manoj Jarange Solapur Tour : मोदी, ठाकरे, पवारांनंतर मनोज जरांगेही सोमवारी सोलापुरात; कोणाला पाडायचा संदेश देणार?

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे पदाधिकारी प्रचारात दिसत नाहीत, या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, महायुतीमध्ये काही कार्यकर्ते लवकर काही उशिरा कामाला लागतात. यापूर्वी समोरासमोर आम्ही लढलो आहोत. एवढ्या वर्षाचे राजकारण आहे. त्यामुळे थोडा वेळ लागत आहे. मात्र, ते पूर्ण ताकतीनिशी आमच्याबरोबर येतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस (Congress) कधीही आंबेडकर परिवाराला सहन करत नाही. काँग्रेसने भंडारा व मुंबई या दोन ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला आहे. काँग्रेस पक्ष हा बाबासाहेबांच्या, आंबेडकर परिवाराच्या विरोधी आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना घेतले नाही, त्यांना सोडून दिले, अशी टीका बावनकुळेंनी केली.

नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही, या प्रश्नावर ते म्हणाले, नाशिकची जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चेमध्ये आहे. भारतीय जनता पार्टी तेथे निवडणूक लढणार नाही. प्रीतम ताईला चांगल्या स्थानावर बसवण्यासाठी आमची जबाबदारी आहे. त्यासाठी मी, देवेंद्र फडणवीस पुढाकार घेत आहोत.

मुंबईतून पूनम महाजन यांचा पत्ता कट करून उज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, पूनम महाजन यांचा योग्य विचार पक्षाकडून सुरू आहे. उज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षाच्या उच्चस्तरीय केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारी दिली आहे. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांनी त्यांचा सन्मान केला आहे. उज्वल निकम हे लोकसभेत जातील आणि त्यांचा जो अभ्यास आहे त्यातून नरेंद्र मोदी यांच्या सरकार मध्ये अत्यंत चांगलं काम निकम करतील.

(Edited By - Rajanand More)

Sharad Pawar, Chandrashekhar Bawankule
Abhijeet Patil News : सोलापुरात मोठी घडामोड; पवारांचे विश्वासू अभिजित पाटील सोलापुरात आज फडणवीसांना भेटणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com